
मागील काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता गोविंदा याचा घटस्फोट होणार असल्याचे सातत्याने सांगितले जाते. त्यामध्येच काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, गोविंदाची पत्नी सुनिता आहूजा यांनी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज देखील केलाय. मागील काही दिवसांपासून दोघे विभक्त देखील राहत होते. आता गोविंदाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. मात्र, घटस्फोटाच्या चर्चांमध्ये गोविंदा हा गायब आहे. गोविंदाच्या पत्नीने 5 डिसेंबर 2024 रोजी बांद्रातील कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. गोविंंदा आणि सुनिता यांच्या घटस्फोटासाठी मराठी अभिनेत्री कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. 30 वर्षांच्या मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाचे अफेअर सुरू असल्याचा खुलासा काही रिपोर्टमध्ये करण्यात आला.
सुनिता आहूजा या मागील काही दिवसांपासून गोविंदाबद्दल काही विधाने करताना दिसल्या ज्यानंतर दोघांच्या नात्यामध्ये सर्वकाही व्यवस्थित नसल्याचे स्पष्ट झाले. आता त्यामध्येच सुनिता आहूजा यांची एक मुलाखत चर्चेत आलीये. त्या मुलाखतीत त्या एकप्रकारे हात सोडून गोविंदाला परत येण्यास सांगताना दिसत आहेत. हेच नाही तर माझ्या इतके प्रेम गोविंदावर दुसरे कोणीही करू शकत नसल्याचेही त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
मुलाखतीत सुनिता आहूजा यांनी म्हटले की, गोविंदाला भूक कधी लागते, त्याला कधी अॅसिडिटी होते, त्याला कधी काय पाहिजे हे फक्त मला माहिती आहे. मी जितके गोविंदाला ओळखते तितके त्याला कोणीच ओळखू शकत नाही. मी त्याच्यावर मनातून प्रेम करते. माझ्या इतके प्रेम त्याच्यावर दुसरे कोणीच करू शकत नाही. सुनिता आहूजा यांनी पुढे म्हटले की, मला 90 दशकातील गोविंदा आवडतो. जुनावाला..
सुनिता यांनी हात जोडून म्हटले की, परत ये गोविंदा तू…माझा चीची तू खरोखरच परत ये…माझ्याजवळ ये माझा चीची….या मुलाखतीतून गोविंदाला मोठा संदेश हा सुनिता यांनी दिला. सुनिता यांनी अगदी स्पष्ट केले की, माझ्या इतके त्याच्यावर कोणीही प्रेम करू शकत नाही. हाऊटरफ्लाईच्या रिपोर्टनुसार, सुनिता आहूजा यांनी हिंदू विवाह अधिनियम 1955 नुसार, 13(1)(i),(ia),(ib) प्रमाणे घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र, यावर अजून तरी गोविंदा किंवा सुनिता आहूजा यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे भाष्य करण्यात आले नाहीये.