Atique Ahmed | ‘त्यांच्यासोबत जे झालं ते कर्म, पण…’, अतिक आणि अशरफ यांच्या हत्येनंतर असं का म्हणाला अभिनेता?

| Updated on: Apr 19, 2023 | 10:47 AM

पोलिसांसमोर अतिक आणि अशरफ यांची गोळ्या झाडून हत्या; दोघांच्या हत्येनंतर सर्वत्र खळबळ माजलेली असताना 'हा' अभिनेत्याचं मोठं वक्तव्य..

Atique Ahmed | त्यांच्यासोबत जे झालं ते कर्म, पण..., अतिक आणि अशरफ यांच्या हत्येनंतर असं का म्हणाला अभिनेता?
Follow us on

मुंबई : आरोपी गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची शनिवारी हत्या करण्यात आली. पोलिसांसमोर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची गोळ्या झाडून हत्या केल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सध्या पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत असताना अनेक जण अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येनंतर खळबळजनक वक्तव्य करत आहेत. सध्या सर्वत्र अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येची चर्चा आहे. याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता केआरके याने मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्याच्या वक्तव्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. यावेळी केआरके याने अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या कर्माबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

केआरके ट्विट करत म्हणाला, ‘मी एका सेकंदासाठी देखील अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांचं समर्थन करणार नाही. त्यांच्यासोबत जे झालं ते त्यांचे कर्म होते. मला कोणत्याही अपराध्याचं समर्थन करायचं नाही, मग तो कोणीही असो… पण मी पुन्हा सांगतो, कायद्याला आपल्या हातात नाही घेतलं पाहिजे. न्यायपालिकेला आपलं काम करु द्या…’ असं केआरके ट्विट करत म्हणाला.

हे सुद्धा वाचा

याआधी देखील अभिनेत्याने एक ट्विट केलं होतं. ज्यामध्ये त्याने आमदार आणि खासदार यांचा उल्लेख केला होता. अभिनेत्याच्या या ट्विटमुळे देखील सर्वत्र खळबळ माजली होती. केआरकेचं ट्विट करत म्हणाला, ‘अतिक अहमद जो पाच वेळा आमदार, एकदा खासदार राहिला आहे. तर त्याचा भाऊ अशरफ एक वेळा आमदार राहिला आहे. या लोकांची पोलिसांसमोर गोळी झाडून हत्या करण्यात आली. देशात जर आमदार, खासदार सुरक्षित नसतील तर, सामान्य व्यक्तींच्या सुरक्षेचा प्रश्नच उपस्थित राहत नाही…याच प्रकारे जर प्रत्येक गुन्हेगाराचा न्यायालयाबाहेर निर्णय होणार असेल तर ९८ टक्के राजकारण्यांचा अंत असाच होईल!’ असं अभिनेता म्हणाला.

अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची हत्या

मिळालेल्या माहितीनुसार; शनिवारी रात्री १० वाजता पोलिसांचं पथक अतिक अहमद आणि अशरफ यांना प्रयागराजमधील कोल्विन रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात होते. दरम्यान, पत्रकार म्हणून पोचलेल्या तीन हल्लेखोरांनी दोघांवर गोळीबार केला. या हल्ल्यात अतिक आणि अशरफ या दोघांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस सध्या याप्रकरणी चौकशी करत आहेत.