AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

R. Madhavan चं मोठं वक्तव्य, ‘चांगले स्विमर्स भारतात पण लोक माझ्याच मुलाबद्दल बोलतात, कारण..’

R. Madhavan : बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता आर. माधवन कायम त्याच्या सिनेमांमुळे चर्चेत असतो. पण आता अभिनेता मुलाच्या करियरमुळे चर्चेत आला आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने मुलाच्या करियरबद्दल आणि भारतातील स्विमर्सबद्दल मोठा खुलासा केला आहे.

R. Madhavan चं मोठं वक्तव्य, 'चांगले स्विमर्स भारतात पण लोक माझ्याच मुलाबद्दल बोलतात, कारण..'
R Madhavan
| Updated on: Aug 05, 2026 | 8:32 AM
Share

R. Madhavan : अभिनेता आर. माधवन याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही, अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्याने चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता माधवन त्यांच्या सिनेमांमुळे नाही तर, मुलाच्या करियरमुळे चर्चेत आला आहे. मुलाच्या करियरसाठी अभिनेत्याने भारत सोडून दुबईत राहण्याचा निर्णय घेतला. यामागचं कारण आहे, अभिनेत्याच्या मुलाचं स्विमिंग ट्रेनिंग… मुलाला स्विमिंग क्षेत्रात चांगल्या संधी मिळाव्यात याच कारणासाठी अभिनेत्याने दुबईत जाण्याचा निर्णय घेतला. माधवन यांच्या मुलाचं नाव वेदांत असं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर वेदांत अहमदाबादमध्ये भारतीय संघासोबत सराव करायचा. त्यानंतर, मुलाच्या कारकिर्दीतील या निर्णायक टप्प्यावर दुबईत पाऊल ठेवलं नसतं तर, मुलाचा प्रवास आज कदाचित थोडा वेगळा असता… असं मत देखील अभिनेत्याने व्यक्त केलं.

एका मुलाखतीत मुलाच्या करियरबद्दल बोलताना माधवन म्हणाला, ‘वेंदात याच्यासोबत भारतात अनेक असं स्विमर्स आहेत, जे खूप उत्तम आहे. पण ते माझी मुलं नाहीत, त्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळत नाही. मी कुठेही गेलो तरी मला वेदांत याच्याबद्दल विचारलं जातं… कारण तो माझा मुलगा आहे… मी माझ्या मुलाला फक्त एक गोष्ट सांगितली आहे, स्टारडम खूप भयानक गोष्ट आहे.. माझ्या मित्रा… तुला हे फार कमी वयात मिळाली. हे स्टारडम संभाळून ठेवायला शिक… हे येत – जात राहतं आणि यामुळे मानसिक शांती प्रभावित होते.’

पुढे अभिनेता म्हणाली, ‘मुलांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा त्यांची सुरुवात असते… किशोरवयीन काळ हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो, जेव्हा आंतरराष्ट्रीय दर्जा गाठण्यासाठी तरुण स्विमर्सना सातत्यपूर्ण प्रशिक्षणाची गरज असते. एखाद्या मुलाचं आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू बनण्यापर्यंतच्या प्रवासात वेगाने होणाऱ्या शारीरिक वाढीचा एक काळ असतो.’

‘किशोरवयात म्हणजेच 10 ते 17 वयोगटात एखाद्या मुलाची उंची एका महिन्यातच तीन इंचांनी वाढल्याचं तुम्हाला अचानक दिसून येऊ शकतं. यालाच ‘ग्रोथ स्पर्ट’ असे म्हणतात. जर त्यांनी या काळात कठोर प्रशिक्षण घेतलं नाही, तर त्यांची शरीरयष्टी आंतरराष्ट्रीय स्तरासाठी कधीच तयार होणार नाही.’ असं देखील अभिनेता म्हणाला.

दुबईत जाण्याचा का घेतला निर्णय…

2020 मध्ये कोरोना या विषाणूने जगात हाहाकार माजवलेला. तेव्हा वेदांत फक्त 14 वर्षांचा होता आणि स्विमिंगसोबतच सर्वकाही ठप्प झालेलं. अशात माधवन याने गोव्यातील खाजगी प्रायव्हेट पूल आणि प्रशिक्षण सुविधांसारख्या पर्यायांचा विचार केला. अभिनेत्याने स्पष्ट केलं की, भारतीय राष्ट्रीय संघ दुबईमध्ये सराव करत असल्यानं, वेदांतचं पुढील दोन वर्षांचं प्रशिक्षण सुरू राहावं या उद्देशाने अभिनेत्याने दुबईत राहण्याचा निर्णय घेतला.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल