
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह हा तूफान चर्चेत आहे. रणवीर सिंहचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. रणवीर सिंह हा कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. हेच नाही तर रणवीर सिंह सोशल मीडियावर देखील चांगलाच सक्रिय दिसतो. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओही शेअर करतो. रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत रंगताना दिसत आहे. रणवीर सिंह याने सोशल मीडियावरून दीपिका पादुकोण हिच्यासोबतच्या लग्नाचे सर्व फोटो डिलीट केले, यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आणि विविध चर्चा रंगण्यास सुरूवात झाली.
रणवीर सिंह याने लग्नाचे फोटो नेमके का डिलीट केले? असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता. रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाच आता रणवीर सिंहने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. आता रणवीर सिंहने दीपिका पादुकोण हिला एक नवीन नाव दिले आहे. त्याने एक फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलाय.
हा खास फोटो शेअर करत त्याने दीपिका पादुकोण हिचे काैतुक केले. हेच नाही तर यासोबतच त्याने दीपिका पादुकोणचे नवीन नाव देखील ठेवले. ही पोस्ट शेअर करत रणवीर सिंहने दीपिका पादुकोण हिला ‘बेबी ममा’ म्हटले आहे. आता यावरून तर हे स्पष्ट आहे की, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहच्या नात्यात सर्वकाही व्यवस्थित आहे.
या स्क्रीनशॉटसोबतच रणवीर सिंह याने काही इमोजी देखील शेअर केले आहेत. आता रणवीर सिंहने शेअर केलेली ही पोस्ट पाहून चाहत्यांमध्ये आनंद बघायला मिळतोय. दीपिका पादुकोण ही लवकरच बाळाला जन्म देणार आहे. रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रेग्नंसीची घोषणा केलीये.
विशेष म्हणजे दीपिका पादुकोणचे चित्रपट धमाका करताना दिसत आहेत. दीपिका पादुकोण ही बॉलिवूडची टॉप अभिनेत्री नक्कीच आहे. दीपिका पादुकोण ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन देखील आहे. दीपिका पादुकोण हिने अभिनय आणि चित्रपटामधून मोठा पैसा कमावला आहे. दीपिकाचा चाहता वर्ग देखील अत्यंत मोठा आहे.