हा बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नाचा सावत्र भाऊ; संजय लीला भन्साळींसोबत केलाय चित्रपट

विनोद खन्ना यांनी दोन लग्न केली होती. विनोद खन्नाला दोन सावत्र भावंड आहेत. ज्याबद्दल फार कमी जणांना माहित असेल.  अक्षय खन्नाच्या सावत्र भावाने बॉलिवूडमध्ये कामही केलं आहे. तसेच संजय लीला भन्साळींसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कामही केल. मात्र अपेक्षित यश न मिळाल्याने त्याने चित्रपट सोडून अध्यात्माचा मार्ग निवडला. प्रसिद्धीपासून दूर राहून तो आता अध्यात्मात रमला आहे.कोण आहे हा अभिनेता? 

हा बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नाचा सावत्र भाऊ; संजय लीला भन्साळींसोबत केलाय चित्रपट
Bollywood Actor Sakshi Khanna is Akshaye Khanna stepbrother
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 12, 2025 | 3:02 PM

बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “धुरंधर” चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. “छावा” नंतर अक्षयने पुन्हा एकदा त्याच्या दमदार अभिनयाने सर्वांना चकित केले आहे. “धुरंधर” मध्ये असे अनेक दृश्ये आहेत ज्यात अक्षयने रणवीर सिंगलाही मागे टाकलं आहे. अक्षय खन्ना जेवढा त्याच्या अभिनयाने चर्चेत राहिला तेवढा तो वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच अलिप्त राहिला. जसं की त्याचं कुटुंब. हे फार कमी जणांना माहित असेल की अक्षय खन्नाला सावत्र भाऊ बहिण देखील आहे.

अक्षय खन्नाचा सावत्र भाऊ साक्षी कोण आहे?

दिवंगत ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांनी दोन लग्न केली होती. विनोद खन्ना यांची मुले अक्षय खन्ना आणि राहुल खन्ना यांच्याबद्दल सर्वांना माहिती आहे. ही दोघेही सख्खे भाऊ. विनोद खन्ना यांनी कविता खन्ना यांच्याशी दुसरे लग्न केले. साक्षी खन्ना आणि श्रद्धा खन्ना ही दोन्ही विनोद आणि कविता यांची मुले आहेत. म्हणजे अक्षय खन्नाचे सावत्र भाऊ-बहिण. साक्षीचा जन्म 12 मे 1991 रोजी मुंबईत झाला. साक्षीनेही वडील आणि भावाप्रमाणे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला, परंतु त्याला अपेक्षित असे यश मिळाले नाही. त्यानंतर साक्षीने चित्रपट सोडले अन् अध्यात्मात रस दाखवला.


अशी होती चित्रपट कारकीर्द

वृत्तानुसार, साक्षी खन्नाने संजय लीला भन्साळी यांच्या “बाजीराव मस्तानी” आणि मिलन लुथरिया यांच्या “वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा” सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. त्यानंतर त्याने अभिनयात हात आजमावला आणि अनेकशॉर्ट फिल्ममध्ये काम केले.

अध्यात्माकडे कल का?

एका वृत्तानुसार, साक्षीने मिलन लुथरियाच्या चित्रपटातून पदार्पण करणार होता. परंतु, तो चित्रपट बनला नाही. त्यावेळी, चित्रपट निर्मात्याने सांगितले होते की, “साक्षी खूप प्रतिभावान आहे आणि भूमिका गुंतागुंतीची आहे. त्यामुळे, त्याला पुढील काही महिन्यांत खूप होमवर्क करावा लागेल.” या अभिनेत्याने नेहमीच व्यावसायिक चित्रपटांपेक्षा इंडी चित्रपटांमध्ये जास्त रस दाखवला आहे. साक्षीने स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस देखील सुरू केले होते. मात्र नंतर, तो अध्यात्माकडे वळला, ज्यामुळे जगाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलला. तथापि, त्याने नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत केले. साक्षीचे सोशल मीडियावर 14 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.