सलमान खानचं होणार मोठं नुसकान, तब्बल 50 कोटी रुपयांचा प्रश्न, नेमकं काय आहे प्रकरण?
स्वतःच नुकसान झालं तरी चालेल, पण मित्रांच्या मदतीसाठी कायम धावणार अभिनेका सलमान खान पुन्हा चर्चेत आला आहे. सलमान खान याने आगामी सिनेमासाठी स्वतःचं मोठं नुकसान केलं आहे... अभिनेत्याला तब्बल 50 कोटी रुपयांचा तोटा होऊ शकतो.. असं सांगितलं जात आहे, तर जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे.

अभिनेता सलमान खान कायम मित्रांसाठी पुढाकार घेत असतो. सांगायचं झालं तर, बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्याच्या यादीत सलमान अव्वल स्थानी आहे. अभिनेता एका सिनेमासाठी जवळपास 120 कोटी रुपये घेतो. पण SVC 63 सिनेमासाठी भाईजान कमी मानधन घेण्यासाठी तयार झाला आहे… यामागे अभिनेत्याचा खास मित्र आहे… तर जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण…
सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता सलमान त्याच्या मानधनामुळे चर्चेत आलाय. सिनेसृष्टीतील एका सूत्राच्या मते, SVC 63 सिनेमासाठी भाईजान कमी मानधन घेण्यासाठी तयार झाला आहे. कारण मित्र रफी काझी सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. सिनेमाला आकार देण्यात रफीने महत्त्वाची भूमिका बजावली असून तो या सिनेमाच्या निर्मात्यांपैकी एक आहे.
रिपोर्टनुसार, गेल्या दोन दशकांपासून सलमान खान एका सिनेमासाठी जवळपास 120 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक मानधन घेत आहे, अशात सलमान खानने ‘SVC 63’ या सिनेमाच्या निर्मात्यांना मानधनात मोठी सवलत दिली आहे; याचं मुख्य कारण म्हणजे त्याचा जुना मित्र रफी काझी या प्रोजेक्टमध्ये मध्यस्थ म्हणून काम करत आहे. याच मैत्रीमुळे ‘भाईजान’ने सुरुवातीलाच आपलं मानधन कमी करण्यास सहमती दर्शवली.
मात्र, मानधनात कपात करण्याच्या बदल्यात सलमानने सिनेमाच्या नफ्यातील वाट्यात त्याचा हिस्सा आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, अशा प्रकारच्या कोणत्याही ‘बॅकएंड डील’बाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
सांगायचं झालं तर, सलमान खान व्यावसायिक मानधन आणि अधिकार यांपलीकडे जाऊन, सलमान खान चित्रपटसृष्टीत मित्रांना मदत करण्यासाठीही ओळखला जातो. त्याने अनेक चित्रपटांमध्ये मोफत काम केलं आहे. अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्या ‘राजा शिवाजी’सारख्या सिनेमांमध्ये अभिनेत्याने कोणतेही मानधन न घेता ‘कॅमिओ’ किंवा विशेष भूमिका साकारल्या आहेत.
अजय देवगणने एकदा सांगितले होते की, ‘सन ऑफ सरदार’ (Son of Sardaar) या सिनेमातील ‘पो पो’ (Po Po) या गाण्यात झळकण्यासाठी सलमानने मानधन घेण्यास स्पष्टपणे नकार दिला होता; अजयच्या म्हणण्यानुसार, सलमानने केवळ इतकंच म्हटलं होतं, “तू माझा भाऊ आहेस; मी मित्रांकडून पैसे घेत नाही.”