
अभिनेता सलमान खान याला लहान मुलांची प्रचंड आवड आहे… असं अनेक अभिनेत्याच्या कृतीतून दिसून आलं आहे. चिमुकल्या चाहत्यांच्या घोळक्यात सलमान खान याला कायम स्पॉट करण्यात येत. शिवाय सलमान खान देखील त्याच्या चिमुकल्या चाहत्यांना नाराज करत नाही. अनेकदा त्यांच्यासोबत सेल्फि काढताना अभिनेत्याला पाहिलं जातं. दरम्यान, नुकताच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये सलमान खान याने बाप होण्याची इच्छा व्यक्त केली.
सलमान खान याने वयाच्या 59 व्य वर्षी बाप होण्याची ईच्छा व्यक्ती केली आहे. सांगायचं झालं तर, अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज यांचा मुलगा अरहान खान याच्या ‘दम बिरयानी’ या पॉडकास्टमध्ये भाईजानने बाप होण्याची इच्छा व्यक्त केली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याची चर्चा रंगली आहे.
सलमान खान म्हणाला, माझ्याकडे अद्याप वेळ आहे, मी मुल दत्तक घेवू शकतो… सलमान खान, अरहान याला विचारतो, ‘तू मला पॉडकास्टमध्ये का बोलावलं…’ यावर अरहान म्हणाला, ‘मला तुझ्यासोबत काही वेळ व्यतीत करायचा होता आणि त्या आठवणी जपून ठेवायच्या आहेत… तुझ्या मुलांना देखील पॉडकास्ट पाहाता येईल…’
पुढे सलमान खान म्हणाला, ‘तुझ्याकडे देखील वेळ आहे आणि माझ्याकडे देखील अधिक वेळ आहे.’ सध्या सर्वत्र सलमान खान याची चर्चा रंगली आहे. पॉडकास्टमध्ये अभिनेत्याने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल देखील अनेक खुलासे केले आहेत. भाईजान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.
सलमान खान याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता आजही अविवाहित आहे. सलमान खानच्या आयुष्यात अनेकदा प्रेमाची एन्ट्री झाली. अनेक अभिनेत्रींसोबत सलमान खान रिलेशनशिपमध्ये होता. पण कोणत्यात अभिनेत्रीसोबत सलमान खानचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.
अभिनेत्री संगिता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ यांसारख्या अनेक अभिनेत्रींसोबत सलमान खान रिलेशनशिपमध्ये होता. पण वयाच्या 59 व्या वर्षी सलमान खान संपत्ती आणि प्रसिद्धी असूनही एकटाच आयुष्य जगत आहे.