संजय दत्त याला भारतात मिळत नाही शांतता, थेट म्हटले, मला इथे..

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त कायमच चर्चेत असलेले नाव आहे. मात्र, आता संजय दत्त याच्यावर लोक भडकताना दिसत आहे. त्याने जे काही विधान केले, त्यावरून लोक चांगलाच संताप व्यक्त करताना दिसत आहेत. त्याच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहेत.

संजय दत्त याला भारतात मिळत नाही शांतता, थेट म्हटले, मला इथे..
Sanjay Dutt
| Updated on: Oct 04, 2026 | 9:34 AM

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त त्याच्या चित्रपटांसोबत त्याच्या खासगी आयुष्यामुळेही तूफान चर्चेत असतो. पुण्याच्या येरवडा जेलमध्ये आपली शिक्षा संजय दत्त याने पूर्ण केली. संजय दत्तचे कुटुंबिय दुबईत स्थायिक आहे. संजय दत्त बॉलिवूड चित्रपटांमध्ये धमाका करतो. संजय दत्तने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये धमाकेदार चित्रपट दिली आहेत. त्यातच संजय दत्त याने भारताबद्दल असे काही विधान केले की, जो मोठ्या वादात फसताना दिसतोय. सोशल मीडियावर त्याच्या या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे. संजय दत्त याने थेट भारतात आता शांती मिळत नसल्याचे मोठे विधान केले. संजय दत्त याच्यावर जोरदार टीका होत आहे. संजय दत्त शेखर सुमनच्या शेखर टुनाईटमध्ये सहभागी झाला. गांधी जयंती स्पेशल एपिसोडमध्ये मुन्नाभाईच्या लूकमध्ये संजय दत्त पोहोचला.

यादरम्यान संजय दत्त स्वत:ला पाच मिनिटांसाठी नरेंद्र मोदी असल्याचे म्हटले. यावेळी संजय दत्तने नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील व्यंग्यात्मक भाषण केले. या शोचा प्रोमो तूफान व्हायरल होत आहे. टॅरिफवरूनही मजाक उडवला. वारंवार त्यांच्याकडून गांधीगिरीचा उल्लेख करण्यात आला. मॉक PM स्पीच सुरू होण्यापूर्वी संजय दत्त याने भारताबद्दल बोलताना म्हटले की, भारतात शांती हवी आहे.

Loading...

या देशात खूप चांगले लोक आहेत. पण येथे शांती हवी आहे. आता मला आमच्या देशात ती शांती जाणवत नाही. आम्ही भारतीय मोठ्या मनाचे आहोत आणि पाहुण्यांचे मोठ्या आनंदाने स्वागत करतो. आम्ही खूप काही दिले आहे. आम्हाला कायमच असे राहायचे आहे. मी प्रार्थना करतो की, हे दिवस आमच्या देशात लवकरत परत येतील.

यादरम्यान संजय दत्तला भारतात शांतता का दिसत नाही? भारतात काय अशांत आहे म्हणत लोक त्याला खडेबोल सुनावत आहेत. भारताबद्दल मोठे विधान करताना संजय दत्त दिसला. पण त्याने भारतातील शांतीबद्दल मोठे विधान केले. त्याच्य या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us