शाहरुख खानच्या आलिशान ‘मन्नत’मध्ये काम करणारा हेल्पर, बेडरुमचा व्हिडीओ व्हायरल
अभिनेता शाहरुख खान याच्या बंगल्याचं काम सध्या सुरु असून सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये बंगल्यात हेल्पर काम करताना दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त व्हायरल व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

अभिनेता शाहरुख खान याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्याने चाहत्यांचं मनोरंजन केलं. सांगायचं झालं तर, किंग खान फक्त त्याच्या सिनेमांमुळेच नाही तर, त्याच्या रॉयल आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. तर मुंबईत असलेला अभिनेत्याचा ‘मन्नत’ बंगला देखील कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. अभिनेत्यांच्या घराबाहेर चाहते फोटो देखील काढत असतात. शाहरुख खानचे चाहते अनेकदा ‘मन्नत’च्या बाहेर, त्याच्या घराची एक झलक पाहण्यासाठी उभे असलेले दिसतात.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ‘मन्नत’मधील बेडरूमचा आतील भाग दिसत असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्तीही दिसत आहे; ती व्यक्ती राजस्थानमधील असून ‘मन्नत’मध्ये हेल्पर म्हणून काम करते, असा दावा केला जात आहे. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर अद्याप कोणतीही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
व्हिडीओच्या सुरुवातीला एक बेडरुमची एक झलक दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, खोलीत एक मोठा बेड आहे आणि भोवती साईड टेबल, आरसा, लायटिंग आणि मार्बलच्या लाद्या… व्हिडीओमध्ये खोलीचा दुसरा भाग देखील दिसतो. त्यानंतर खिडकीतून भव्य समुद्र दिसतो.
खिडकीजवळ गेल्यावर बाहेर समुद्राचं दृश्य दिसतं. त्याच वेळी, खिडकीजवळ एक व्यक्ती बसलेली दिसून येते. व्हिडिओमध्ये, ती व्यक्ती पॉलिथिन किंवा प्लास्टिकचा कागद लावण्याच्या आणि त्याशी संबंधित इतर कामांमध्ये व्यस्त असल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती राजस्थानमधील एक हेल्पर असून ती सध्या शाहरुख खानचा बंगला ‘मन्नत’मध्ये काम करत आहे.
व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘हा शाहरुख खान याचा बेडरुम नाही.’ अन्य एक नेटकरी म्हणाला. ‘मी विचार करत होतो की, किंग खानच्या घरात सोने – चांदीचं बेड असेल. पण याठिकाणी तर सर्वकाही सामान्य दिसत आहे.’, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख खान याच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. व्हिडीओ शाहरुख याच्या बंगल्यातील आहे की नाही? यावर कोणाची आर्थिक माहिती समोर आलेली नाही.