
Shah Rukh Khan Marksheet : बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही… अभिनेत्याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज शाहरुख सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत अभिनेत्यांमध्ये गणला जातो… पण एक वेळ अशी देखील होती, जेव्हा शाहरुख खान कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. सध्या सोशल मीडियावर शाहरुखा याचा मार्कशीट तुफान व्हायरल होतं आहे. ज्यामुळे किंग खानच्या जुन्या आठवणी ताज्या करण्याची संधी चाहत्यांना मिळाली आहे…
व्हायरल झालेला फोटो हंसराज कॉलेजचा आहे, जिथे शाहरुख खानने 1985 आणि 1988 दरम्यान अर्थशास्त्रात पदवी पूर्ण केली. व्हायरल झालेल्या मार्कशीटनुसार, अभिनेत्याने काही विषयांमध्ये 92 गुणांसह सर्वोत्तम गुण मिळवले. इंग्रजीमध्ये, त्याने 51 गुण मिळवले, तर गणित आणि भौतिकशास्त्रात प्रत्येकी 78 गुण मिळवले. सर्व विषयांमध्ये अभिनेत्याला चांगले मार्क होते. पण इंग्रजीमध्ये मठ्ठ होता.
शाहरुख खान याची मार्कशीट
रोमान्सचा राजा आणि बॉक्स-ऑफिसचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या शाहरुख याच्या चाहत्यांसाठी, हे आकडे पाहणं आणखी मनोरंजक आहे. किंग खानची मार्कशीट पाहिल्यानंतर अनेकांनी त्याचं कौतुक देखील केलं आहे. कॉलेज ते प्रसिद्धीपर्यंतच्या त्याच्या प्रवासाबद्दल कौतुकाने भरलेल्या प्रतिक्रिया आहेत.
महाविद्यालयीन शिक्षणानंतर, शाहरुखने उच्च शिक्षण घेतलं आणि जामिया मिलिया इस्लामिया येथे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला, परंतु नशिबाने त्याला मनोरंजन जगताकडे वळवले. विद्यापीठातील विद्यार्थी ते टेलिव्हिजन अभिनेता आणि अखेर बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या स्टारपैकी एक बनण्याचा त्याचा प्रवास भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रेरणादायी कथांपैकी एक आहे.
शाहरुख याच्याबद्दल सांगायचं झालं तर, आज देखील अभिनेत्याच्या आगामी सिनेमासाठी चाहते उत्सुक असतात. किंग खान लवकरच ‘किंग’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात शाहरुख खान पहिल्यांदा लेक सुहाना खान हिच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.. चाहते देखील सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत.