मुलगा आर्यनच्या ड्रग्स प्रकरणानंतर बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची सोशल मीडियावर पहिली पोस्ट, चाहते म्हणाले…

मुंबई: बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (shahrukh khan) मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियापासून दूर आहे. त्याचा मुलगा आर्यन खान (aryan khan) ड्रग्ज प्रकरणात (drugs case) अडकल्यापासून शाहरुख लाइमलाइटपासून दूर होता. मात्र आज शाहरुखने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. त्यावर त्याच्या चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स येत आहेत. शाहरुख खानची इन्स्टाग्राम पोस्ट शाहरुख खानने इन्स्टाग्रामवर आज एक व्हीडिओ […]

मुलगा आर्यनच्या ड्रग्स प्रकरणानंतर बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची सोशल मीडियावर पहिली पोस्ट, चाहते म्हणाले...
शाहरुख खान. आर्यन खान
| Edited By: | Updated on: Jan 19, 2022 | 5:47 PM

मुंबई: बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (shahrukh khan) मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियापासून दूर आहे. त्याचा मुलगा आर्यन खान (aryan khan) ड्रग्ज प्रकरणात (drugs case) अडकल्यापासून शाहरुख लाइमलाइटपासून दूर होता. मात्र आज शाहरुखने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. त्यावर त्याच्या चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स येत आहेत.

शाहरुख खानची इन्स्टाग्राम पोस्ट

शाहरुख खानने इन्स्टाग्रामवर आज एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. ज्यात तो एका टीव्ही कंपनीची जाहिरात करताना दिसतोय. यावर त्याच्या चाहत्यांनी विविध कमेंट केल्या आहेत.

शाहरूखच्या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्स

शाहरुखच्या या जाहिरातीच्या व्हीडिओवर चाहत्यांच्या कमेंट पहायला मिळत आहेत. ‘कुणी किंग इज बॅक’ म्हटलंय तर कुणी ‘लव्ह यू शाहरुख’ अशी कमेंट केली आहे.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण काय आहे?

2 ऑक्टोबरला क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खान तसंच इतर सात जणांना अटक करण्यात आलं. यामध्ये आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट तसेच मॉडेल मूनमून धमेचा यांचा समावेश होता. त्यानंतर आर्यनला तुरूंगवास भोगावा लागला होता. तेव्हापासून शाहरुख खान लाइमलाइटपासून दूर होता. आज त्याने इन्स्टाग्रामवर व्हीडिओ शेअर केला आहे.

संबंधित बातम्या

पुरस्कारांचं गाठोडं घेऊन ‘पांघरुण’ प्रेक्षकांच्या भेटीला, महेश मांजरेकर दिग्दर्शित सिनेमा 4 फेब्रुवारीपासून सिनेमागृहात

5 मिनिटाच्या आयटम साँगसाठी नोरा घेतेय 50 लाख, समांथाचा आकडा ऐकून तुम्हाला आकडी येईल!

सलमान खान रोज रात्री 12 वाजता मला फोन करतो, मी पण त्याचा फोन घेते, लारा दत्ताचा गौप्यस्फोट