पुरस्कारांचं गाठोडं घेऊन ‘पांघरुण’ प्रेक्षकांच्या भेटीला, महेश मांजरेकर दिग्दर्शित सिनेमा 4 फेब्रुवारीपासून सिनेमागृहात

पुरस्कारांचं गाठोडं घेऊन 'पांघरुण' प्रेक्षकांच्या भेटीला, महेश मांजरेकर दिग्दर्शित सिनेमा 4 फेब्रुवारीपासून सिनेमागृहात
पांघरुण

मुंबई : दिग्दर्शक महेश मांजरेकर (Director mahesh manjarekar) यांचा पांघरुण (panghrun) हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाने अनेक चित्रपट महोत्सवात पुरस्कार प्राप्त केले आहेत. झी स्टुडिओने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या 4 फेब्रुवारीला हा सिनेमा चित्रपटगृहात पहायला मिळेल. आता प्रतिक्षा संपली… घेऊन येतोय ‘पांघरूण’ आणखी लवकर… साक्षीदार व्हा एका संगीतमय, […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Jan 19, 2022 | 4:52 PM

मुंबई : दिग्दर्शक महेश मांजरेकर (Director mahesh manjarekar) यांचा पांघरुण (panghrun) हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाने अनेक चित्रपट महोत्सवात पुरस्कार प्राप्त केले आहेत. झी स्टुडिओने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या 4 फेब्रुवारीला हा सिनेमा चित्रपटगृहात पहायला मिळेल.

पुरस्कारांची लयलूट करणारा चित्रपट

28 व्या ऑस्टिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, मामी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाने मानाचं स्थान मिळवलं. तसंच अनेक पुरस्कार आपल्या नावे केले.

चित्रपटातल्या गाण्यांची जादू

पांघरुण चित्रपट जरी अजून प्रदर्शित झाला नसला तरी त्याची गाणी मात्र तुम्हाला सोशल मीडियावर बघायला मिळतील. या गाण्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच सिनेरसिकांच्या मनात घर केलंय. ‘ही अनोखी गाठ कोणी बांधली’, ‘सतरंगी झाला रे’, ‘इलुसा हा देह’ ही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.

या सिनेमाने अनेक पुरस्कार प्राप्त केलेत. यातली गाणी मनाला मोहिनी घालताहेत. 4 फेब्रुवारीला हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. या सिनेमाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, पाहणं महत्वाचं असेल.

संबंधित बातम्या

5 मिनिटाच्या आयटम साँगसाठी नोरा घेतेय 50 लाख, समांथाचा आकडा ऐकून तुम्हाला आकडी येईल!

सलमान खान रोज रात्री 12 वाजता मला फोन करतो, मी पण त्याचा फोन घेते, लारा दत्ताचा गौप्यस्फोट

म्हणून तेव्हा मी मंगळसूत्र घातलं, प्रियांका चोप्राने सांगितली राज की बात!

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें