कोर्टाने नंबर मागताच शिल्पा शेट्टीचा यूटर्न, थेट घेतला मोठा निर्णय, नियोजित दाैरा…

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा भारत सोडू शकत नाहीत. त्यामध्येच आता नुकताच कोर्टात सुनावणी पार पडली आहे.

कोर्टाने नंबर मागताच शिल्पा शेट्टीचा यूटर्न, थेट घेतला मोठा निर्णय, नियोजित दाैरा...
Shilpa Shetty
| Updated on: Oct 16, 2025 | 1:34 PM

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती उद्योगपती राज कुंद्रा विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. तब्बल 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप आहे. हेच नाही तर जोपर्यंत ही रक्कम जमा करत नाहीत, तोपर्यंत यांना विदेशात जाण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने नाकारली. शिल्पा शेट्टीला देखील या प्रकरणात दिलासा मिळाला नाहीये. विदेशात जाण्याच्या परवानगीसाठी शिल्पा शेट्टी हिने कोर्टात एक अर्ज दाखल केला होता. एका कार्यक्रमासाठी विदेशात जायचे असल्याचे शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी कोर्टात सांगितले होते. यावर कोर्टाने स्पष्ट म्हटले होते की, फक्त फोन कॉल्सचा उल्लेख आमच्यासाठी पुरेसा नाही.

जर तुम्ही फक्त कॉल्सचा संदर्भ देत असाल तर फोन नंबर द्या आणि आम्ही ते स्वतः पडताळू. मात्र, कोर्टाने संबंधित  कार्यक्रमाच्या आयोजकांचा नंबर मागितल्यानंतर आता शिल्पा शेट्टीने युटर्न घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. विदेशात आयोजित कार्यक्रमात शिल्पा शेट्टीला सहभागी व्हायचे होते. मात्र, कोर्टात आयोजकांचा नंबर देण्याऐवजी शिल्पा शेट्टीने थेट नियोजित परदेश दाैराच रद्द करण्याचा निर्णय घेतला.

मागील दोन सुनावण्यांमध्ये परवानगी न मिळाल्याने दौरा रद्द करत आल्याची वकिलांची कोर्टात माहिती दिली आहे. दौरा रद्द केल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयातील याचिका देखील मागे घेतली. 60 कोटींच्या आर्थिक फसवणुकीप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा विरोधात LOC जारी केला आहे. परदेश दौऱ्यासाठी LOC वर स्थगिती मिळण्यासाठी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे संचालक दिपक कोठारी यांनी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. कोर्टाने विदेशात जाण्याची परवानगी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी मागितल्यानंतर स्पष्ट म्हटले होते की, कोर्टा 60 कोटी जमा करा मग आम्ही तुमच्या अर्जावर विचार करू शकतो. सध्या शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय.