
बॉलिवूड अभिनेता सनी देओल याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. सनी देओलचा गदर 2 हा चित्रपट धमाका करताना दिसला. विशेष म्हणजे सनी देओल याला एक वेगळी ओळख मिळालीये. गदर 2 चित्रपट रिलीज होऊन आता साधारणपणे एक वर्षाचा कालावधी झालाय. मात्र, अजून गदर 2 चित्रपटाची चर्चा आहे. गदर 2 चित्रपटाच्या यशाचा आनंद घेताना सनी देओल हा दिसतोय. सनी देओलने गदर 2 चित्रपटाच्या यशानंतर मुंबईमध्ये एका मोठ्या पार्टीचे आयोजनही केले होते. या पार्टीला अनेक बॉलिवूड कलाकार पोहोचले होते. या पार्टीतील फोटो आणि व्हिडीओही व्हायरल होताना दिसले.
आता नुकताच सनी देओल याचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून लोक चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. या व्हिडीओवर चाहते हे वेगवेगळी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. पापाराझीने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय.
व्हिडीओमध्ये सनी देओल याने डोक्यावर टोपी घातली असून हातामध्ये एक बॅग दिसत आहे. सनी देओल विमानतळाच्या सुरक्षा तपासणी गेटवर उभा असून सुरक्षा कर्मचारी त्याचा आयडी तपासत आहेत. यावेळी एक व्यक्तीमध्ये येतो आणि मोबाईलमध्ये काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, तरीही तो सुरक्षा कर्मचारी सनीला चेक करतो.
यावेळी पुढे सनी देओल हा आपल्या डोळ्यांवरील चश्मा काढतो आणि मग तो सुरक्षारक्षक सनी देओल याला जाऊ देतो. यानंतर सनी देओल हा जाताना हसतो, हेच नाही तर तो सुरक्षा कर्मचारी देखील सहताना दिसतोय. आता याचाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. लोक या व्हिडीओवर मजा घेताना दिसत आहेत.
या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, हा तर खूप जास्त मोठा अपमानच आहे. दुसऱ्याने लिहिले की, असे वाटत आहे की, सनी देओल हा मागच्या हातामध्ये हातोडा घेऊनच थांबला आहे. खरोखरच या सुरक्षा कर्मचाऱ्याने सनी देओल याला ओळखले नसेल का? लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.