
Tusshar Kapoor Birthday Special : 1960 च्या दशकात हिंदी सिनेमाधून आपल्या करिअरला सुरूवात करणारे दिग्गज अभिनेता जितेंद्र यांनी 70 व 80 च्या दशकात एकाहून एक सरस चित्रपटात काम केलं. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत त्यांच्या दोन्ही मुलांनी मनोरंजनसृष्टीत पाऊल टाकलं. मुलगी एकता कपूर ही प्रसिद्ध निर्माती असून तिने टीव्ही मालिकांसाह अनेक चित्रपटांचीही निर्मिती केली. तर मुलगा तुषार कपूरने अभिनयाचं क्षेत्र निवडत बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. पण तो वडिलांइतकं यश आणि लोकप्रियता मिळवू शकला नाही. एका स्टारचा मुलगा असूनही, तुषार फ्लॉप अभिनेत्यांच्या यादीत सामील झाला.
याच तुषार कपूरचा आज 49 वा वाढदिवस आहे. 20 नोव्हेंबर 1976 साली जितेंद्र आणि शोभा कपूर यांच्या पोटी त्याचा झाला. बॉलिवूडमध्ये येऊनही त्याचे चित्रपट फार यशस्वी ठरले नाही, ना तो प्रेक्षकांचं मन जिंकू शकला, त्याच्या वैयक्तिक आयुष्याची मात्र खूप चर्चा झाली. त्याने अजूनही लग्न केलेलं नाही, मात्र तो बिन लग्नाचाच पिता बनला आहे.
लग्न न करता झाला एका मुलाचा बाप
आता 49 वर्षांचा असलेला तुषार कपूर स्वतःला कोणासोबतही शेअर करू इच्छित नाही. चार वर्षांपूर्वी त्याने एका मुलाखतीदरम्यान स्वतः हे सांगितले होते. तो म्हणाला, “मी स्वतःला जगात कोणासोबतही शेअर करणार नाही, आता किंवा भविष्यातही हाच निर्णय असेल. म्हणतात ना अंत बला तो सब भला.. शेवट चांगला होणं महत्वाचं ” असं त्याने सांगितलं
मात्र असं असलं तरी 2016 साली तो सरोगसीद्वारे पिता झाला. त्याने त्याचा मुलगा लक्ष्यचे स्वागत केले. आज तो त्याच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे.
मुलापेक्षा वडील जास्त श्रीमंत
तुषार हा त्याचे वडील जितेंद्र यांच्यापेक्षा यश आणि लोकप्रियतेच्या बाबतीतच नाही तर संपत्तीच्या बाबतीतही खूप मागे आहे. 83 वर्षांचे जितेंद्र जवळजवळ दोन दशकांपासून रुपेरी पडद्यापासून दूर आहेत, तरीही त्यांची संपत्ती अब्जावधी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जितेंद्र यांची एकूण संपत्ती 1512 कोटी इतकी आहे तर तुषारची एकूण संपत्ती सुमारे 50 कोटी आहे.
आगामी प्रोजेक्ट्स
2001 साली आलेल्या ‘मुझे कुछ कहना है’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेला तुषार कपून हा, त्याच्या 49 व्या वाढदविसानंतर फक्त एका दिवसाने मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. तो “मस्ती 4” या चित्रपटात झळकणार असून हा चित्रपट उद्या ,म्हणजेच 21 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मिलाप झवेरी यांनी दिग्दर्शित केलेल्या, मस्ती 4 मध्ये आफताब शिवदासानी, रितेश देशमुख आणि विवेक ओबेरॉय यांच्या मुख्य भूमिका आहेत.