
मुंबई : गदर 2 हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसला. गदर 2 (Gadar 2) चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड मोडले आहेत. इतकेच नाही तर गदर 2 हा चित्रपट यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरलाय. गदर 2 या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये अगोदरपासूनच मोठी क्रेझ ही बघायला मिळाली. गदर 2 हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट (Movie) ठरला आहे. गदर 2 चित्रपटाने तब्बल 500 कोटींपेक्षाही अधिक कमाई ही बाॅक्स आॅफिसवर केलीये. गदर 2 हा चित्रपट 22 वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आला, मात्र, तोच जलवा बघायला मिळाला.
गदर 2 चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सनी देओल हा दिसला. सनी देओल आणि अमीषा पटेल हे गदर 2 या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसले. गदर 2 चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी थिएटर बाहेर केली. सनी देओल याने तब्बल 22 वर्षांनंतर हिट चित्रपट दिला आहे. सनी देओल याची जबरस्त अशी फॅन फाॅलोइंग ही देखील बघायला मिळते.
काही दिवसांपूर्वीच सनी देओल याने मुंबईमध्ये गदर 2 चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचे आयोजन केले. सनी देओल याच्या या पार्टीमध्ये बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. या पार्टीतील अनेक व्हिडीओ आणि फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. शाहरूख खान हा देखील सनी देओल याच्या गदर 2 च्या सक्सेस पार्टीला पोहचला होता.
नुकताच आता सनी देओल याने आपल्या कामामधून मोठा ब्रेक घेतला आहे. सनी देओल हा वडील धर्मेंद यांच्या उपचारासाठी थेट अमेरिकेला पोहचला आहे. धर्मेंद्र 87 वर्षांचे असून त्यांना काही आरोग्य समस्या असल्याने त्यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरू आहेत. इतकेच नाही तर पुढील काही दिवस वडिलांसाठी सनी देओल हा अमेरिकेतच राहणार आहे.
धर्मेंद्र याच्या उपचारासाठी सनी देओल हा पुढील 20 दिवस अमेरिकेत राहणार आहे. यावेळी तो वडिलांची सेवा करेल. या रिपोर्टनंतर चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे. धर्मेंद्र यांना नेमके काय झाले की, त्यांचा उपचार हा अमेरिकेत केला जात आहे असे प्रश्न विचारले जात आहेत. रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत धर्मेंद्र हे दिसले.
सनी देओल आता सोशल मीडियाच्या माध्यमातून वडिलांच्या तब्येतीबद्दल नेमके काय अपडेट देतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सनी देओल याचा मुलगा राजवीर देओल हा लवकरच बाॅलिवूडमध्ये धमाका करणार आहे. राजवीर देओल याचा चित्रपट 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल. नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये राजवीर देओल मोठा खुलासा करताना दिसला.