शेतकऱ्यांच्या आक्रोशाला सिनेकालाकारांचा पाठिंबा, रितेश देशमुख, सोनम कपूरसह अनेक कलाकार मैदानात

पंजाबी कलाकारांपाठोपाठ आता बॉलिवूड कलाकारही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत (Bollywood Actors support Farmers protest).

शेतकऱ्यांच्या आक्रोशाला सिनेकालाकारांचा पाठिंबा, रितेश देशमुख, सोनम कपूरसह अनेक कलाकार मैदानात
| Edited By: | Updated on: Dec 07, 2020 | 3:22 PM

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी गेल्या दहा दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला 26 नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली होती. तेव्हापासून हे आंदोलन सुरुच आहे. या आंदोलना दरम्यान केंद्र सरकारसोबत शेतकऱ्यांची पाच वेळा बैठक झाली. मात्र, अद्यापही तोडगा निघाला नाही. शेतकऱ्यांच्या सुरु असलेल्या आंदोलनाला अनेक पंजाबी कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. त्यापाठोपाठ आता बॉलिवूड कलाकारही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत (Bollywood Actors support Farmers protest).

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख, अभिनेत्री सोनम कपूर, दिग्दर्शक हंसला मेहता सारखे अनेक सिनेकलाकारांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं आहे. सोनम कपूरचा पती उद्योगपती आनंद आहुजा यांनीदेखील शेतकरी आंदोलनाचं समर्थन केलं आहे.

“आज जर तुम्ही काही जेवण करत आहात, तर शेतकऱ्यांना धन्यवाद म्हणा. मी देशातील प्रत्येक शेतकऱ्यासोबत उभा आहे”, असं रितेश देशमुख ट्विटरवर म्हणाला आहे (Bollywood Actors support Farmers protest).

सोनम कपूरने शेतकरी आंदोलनाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यासोबतच तिने लेखक डेनियल वेबस्टरचं एक वाक्य शेअर केलं आहे. “जेव्हा शेती सुरू होते तेव्हा इतर कला अनुसरल्या जातात. त्यामुळे शेतकरी मानवी संस्कृतीचे संस्थापक आहेत”, असं सोनम म्हणाली आहे.

सोनमचा पती आनंद आहुजाने देखील शेतकरी आंदोलनाचा फोटो शेअर केला आहे.

अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओल यांनी देखील ट्विटरवर आपली भूमिका मांडली आहे. मी शेतकरी आणि केंद्र सरकारसोबत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दिग्दर्शक हंसन मेहता यांनी ट्विटरवर शेतकऱ्यांसोबत उभा आहे, असं म्हटलं आहे.

दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी ट्विटरवर “जो बोले सो निकाल”, असं म्हटलं आहे.

संबंधित बातमी :

‘दिल्लीच्या आंदोलनात शेतकऱ्यांपेक्षा हमाल अधिक, हे सर्व भामटे लोक : रघुनाथदादा पाटील