
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. ऐश्वर्या राय हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये चित्रपटांमध्ये धमाकेदार भूमिका केल्या. काही दिवस डेट केल्यानंतर तिने अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या मुलीचे नाव आराध्या असून ती कायमच आई ऐश्वर्या राय हिच्यासोबत स्पॉट होताना दिसते. ऐश्वर्या ही कायमच ज्यावेळी आपल्या मुलीसोबत असते, त्यावेळी ती तिचा हात अजिबातच सोडत नाही. आता नुकताच ऐश्वर्या आणि आराध्या यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आराध्या ही आई ऐश्वर्या हिच्यासोबत गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचली होती. यावेळीचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी आराध्या ही पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर लूकमध्ये दिसत आहे. आराध्याचा हा लूक सर्वांना आवडला असून तिने केस मोकळी सोडली होती. ऐश्वर्या ही पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. चाहत्यांना ऐश्वर्याचा लूक देखील आवडलाय.
ऐश्वर्या आणि आराध्या यांचा हा व्हिडीओ पाहून एक चर्चा सुरू आहे. दोघींना एकत्र बघितल्यावर स्पष्ट होतंय की, ऐश्वर्या हिच्यापेक्षा आराध्याची उंची अधिक आहे. आई ऐश्वर्या हिच्यापेक्षा जास्त उंच आराध्या झाल्याचे या व्हिडीओवरून स्पष्ट होत आहे. आराध्याचा हा लूक चाहत्यांना आवडताना दिसत आहे. आराध्या पुढे चालत आहे तर ऐश्वर्या राय ही मागे चालत आहे. यावेळी ऐश्वर्या ही आराध्याची काळजी घेताना दिसत आहे. आईप्रमाणेच केसांची हेअरस्टाईल आराध्याने केल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे.
ऐश्वर्या राय आणि आराध्या यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. लोकांनी या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, आईपेक्षा मुलगी जास्त उंच झाली. दुसऱ्याने म्हटले की, आई ऐश्वर्या राय हिच्यापेक्षा अधिक उंच आराध्या झाली असून सुंदरही दिसत आहे. नेहमीच आराध्या आणि ऐश्वर्या राय या स्पॉट होताना दिसतात. हेच नाही तर काही दिवसांपूर्वीच विदेशात जाताना देखील दिसल्या होत्या.