ऐश्वर्या रायचा मुलगा बनलेला तो क्यूट चिमुकला,22 वर्षांत तो इतका बदलला की ओळखू येणं शक्यच नाही
ऐश्वर्या राय बच्चन आणि अरबाज खान यांच्या 'कुछ ना कहो' चित्रपटातील बालकलाकार पार्थ दवे हा लहान असताना बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय बाल कलाकारांपैकी एक होता.पण आता 22 वर्षांनंतर त्याचं बदललेलं रुप पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. आता त्याला ओळखंणेही कठीण झालं आहे.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचा 2003 मध्ये रिलीज झालेला ‘ कुछ ना कहो’ हा चित्रपट सर्वांना आठवतच असेल.या चित्रपटातील गाणीसुद्धा तेवढी हीट झाली होती. या चित्रपटात एका मुलाने ऐश्वर्याच्या मुलाची भूमिका साकारली होती. या मुलाने त्याच्या गोंडसपणाने सर्वांचे मन जिंकले होते. चित्रपटात या मुलाने ऐश्वर्याची व्यक्तिरेखा नम्रता आणि अरबाज खानची व्यक्तिरेखा संजीव यांचा मुलगा आदित्यची भूमिका साकारली होती .
पार्थ दवेने ऐश्वर्याच्या मुलाची भूमिका साकारली होती.
‘कुछ ना कहो’ चित्रपटात या मुलाने ऐश्वर्या राय आणि अरबाज खानच्या मुलाची भूमिका साकारली होती. त्या मुलाची भूमिका पार्थ दवेने साकारली होती, ज्याची भूमिका सर्वांनाच आवडली होती. त्यानंतर बऱ्याच चित्रपटात पार्थने काम केलं आहे. पण पार्थ 22 वर्षांनंतर पूर्णपणे बदलला आहे आणि त्याचं बदललेली पर्सनॅलिटी पाहून सर्वांनाच आश्चर्यचकित करते. कारण लहानपणी दिसणारा पार्थ हा आता खरोखरच फार वेगळाच दिसत आहे. त्याला ओळखता येणंही शक्य नाहीये.
अनेक चित्रपटांमध्ये काम केले
2000 तिने ‘मुझसे शादी करोगी’, ‘जोधा अकबर’, ‘चुरा लिया है तुमने’, ‘ब्लॅकमेल’, ‘किडनॅप’ आणि सलमान खानच्या ‘मैने प्यार क्यूं किया’ यासह अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम पाहिलं आहे.
तो बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय बाल कलाकारांपैकी एक होता.
विनोदी चित्रपटांपासून ते ड्रामापर्यंत, पार्थने अनेकदा अनेक चित्रपटांमध्ये मोठ्या स्टारच्या बालपणीची किंवा एखाद्या मोठ्या अभिनेत्याच्या मुलाची भूमिका sसाकारली. हा तो काळ होता जेव्हा तो बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय बाल कलाकारांपैकी एक होता. पण पार्थ आता 30 वर्षांचा आहे आणि त्याने अभिनयापासूनही स्वतःला दूर केले आहे.
View this post on Instagram
नोव्हेंबर 2024 मध्ये लग्न झाले
तसेत पार्थ आता विवाहित आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये राजस्थानातील उदयपूर येथे त्याचे शाही पद्धतीने लग्न झाले आहे. त्याच्या इंस्टाग्रामवर 6000 हून अधिक लोक त्याला फॉलो करतात. तो क्रिकेटपटू हार्दिक पंड्याच्या लग्नातही दिसला होता. तथापि, पार्थने कधीही जाहीरपणे सांगितले नाही की त्याने अभिनय का सोडला.असे मानले जाते की तो अशा कलाकारांपैकी एक होता ज्यांनी बाल कलाकार म्हणून जादू निर्माण केली परंतु तो मोठा झाल्यावर त्याचे आकर्षण टिकवू शकला नाही.
