AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या रायच्या स्टार अभिनेत्यावर टॉयलेट साफ करण्याची वेळ, पेट्रोल पंपावर केलं काम कारण… आज जगतोय असं आयुष्य

अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत स्क्रिन शेअर करण्याऱ्या अभिनेत्यावर अशी वेळ आली, ज्यामुळे त्याला टॉयलेट साफ करावे लागले, शिवाय पेट्रोल पंपावर देखील काम करावं लागलं... एकेकाळी स्टारडम अनुभवलेला अभिनेता आज असं आयुष्य जगत आहे...

ऐश्वर्या रायच्या स्टार अभिनेत्यावर टॉयलेट साफ करण्याची वेळ, पेट्रोल पंपावर केलं काम कारण... आज जगतोय असं आयुष्य
Aishwarya Rai
| Updated on: Jun 12, 2026 | 1:11 PM
Share

बॉलिवूडमध्ये ऐश्वर्या राय हिच्यासोबत स्क्रिन शेअर करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. ऐश्वर्या हिच्यासोबत अनेक अभिनेत्यांनी काम केलं, ज्याचा त्यांना प्रचंड फायदा झाला. पण एक अभिनेता असा आहे, ज्याच्यावर कालांतराने टॉयलेट साफ करण्याची वेळ आहे. अभिनेत्याने फक्त ऐश्वर्या हिच्यासोबतच नाही तर, तब्ब, कमल हासम यांसारख्या प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत देखील स्क्रिन शेअर केली. 2000 ते 2006 पर्यंत सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याची चर्चा होती. पण कालांतराने अभिनेता झगमगत्या विश्वापासून दूर झाला आणि त्यांच्या टॉयलेट साफ करण्याची वेळ आली. सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा रंगली आहे, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, अभिनेता मिर्झा अब्बास अली आहे. चाहते अभिनेत्याला ‘अब्बास म्हणून ओळखतात.

अब्बास याने 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कधल देसम’ सिनेमातून अभिनय विश्वात पदार्पण केलं. त्यानंतर एका रात्रीत अब्बास प्रसिद्धी झोतात आला. एवढंच नाही तर, अब्बास याने टॉयलेट क्लीनर ब्रँडसाठी देखील जाहिरात केली. पण यासाठी अभिनेत्याला टीकेचा सामना करावा लागला. पण यशाच्या शिखरावर असलेल्या अब्बास याचे नशीब अचानक पलटलं. अभिनेत्याचे सिनेमे हीट होत नसल्यामुळे, निर्मात्यांनी देखील त्याच्याकडे पाठ फिरवली… त्यानंतर अब्बास याने बिझनेस करण्याचा विचार केला. पण त्याला यश मिळालं नाही.

दुबईत प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी गेलेल्या अब्बास याचं मोठं नुकसान झालं. त्याची परिस्थिती इतकी बिघडली की, त्यला निर्मात्यांकडून पैसे उधार घ्यावे लागले. तेच कर्ज फेडण्यासाठी अभिनेत्याला अनेक सिनेमांमध्ये मोफत काम करावं लागलं. पण याच कारणामुळे त्याच्या आर्थिक अडचणी देखील वाढत गेल्या. 2006 मध्ये अब्बास याला सिनेमांमध्या काम मिळणं बंद झालं. यामुळे अभिनेत्याला स्वतःचं फ्लॅट्स आणि जमीन देखील विकावी लागली.

अखेर त्रासलेला अब्बास भारत सोडून परदेशात गेला आणि त्याठिकाणी टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करु लागला. एका मुलाखतीत अब्बास म्हणाला, ‘आर्थिक तंगीमुळे मी पेट्रोल पंपावर काम केलं. टॉयलेट देखील साफ केले.’ आयुष्यात मोठे संघर्ष आल्यानंतर देखील अब्बास याने माघार घेतली नाही.अखेर अभिनेता 2023 मध्ये ‘बिग बॉस तामिळ 7’ मध्ये दिसला. पण शोनंतर देखील त्याला कोणत्या सिनेमात काम मिळालं नाही.

पण सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे, अब्बास याची प्रतिक्षा अखेर संपली. अनेक वर्षांनंतर, ‘प्राइम व्हिडिओ’वरील तमिळ क्राईम थ्रिलर मालिका ‘एक्झाम’ (Exam) मध्ये तो जेलरची भूमिका साकारताना दिसला. या भूमिकेसाठीही त्याचं खूप कौतुक झालं.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा