
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन बॉलिवूडच्या सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या जोडप्यांपैकी एक आहे. त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर चाहत्यांच्या बारीक नजरा असतात. काही दिवस एकमेकांना डेट केल्याने 2007 मध्ये त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, लग्नाच्या इतक्या दिवसांनंतर त्यांचे नाते जोरदार चर्चेत असून दोघे घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले जाते. अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांनी चाहत्यांना मोठा धक्का बसला. मात्र, बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही यावर भाष्य केले नाही किवा चर्चा चुकीच्या असल्याचेही पुढे येऊन कोणीही सांगितले नाही. मध्यंतरी असेही सांगितले जात होते की, ऐश्वर्या राय हिने जलसा बंगला सोडला असून ती तिच्या आईसोबत राहत आहे. ऐश्वर्याने घटस्फोटाबद्दल भाष्य केले.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन टीव्ही होस्ट ओप्रा विन्फ्रेच्या शोमध्ये दिसले. यावेळी आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना दोघेही दिसले. पहिल्यांदाच घटस्फोटाबद्दल बोलताना ऐश्वर्या दिसली. ऐश्वर्या रायने स्पष्ट शब्दात सांगितले की, आम्ही घटस्फोटासारख्या गोष्टींचा विचारही करत नाहीत. हेच नाही तर ऐश्वर्या राय हिने बच्चन कुटुंबियांसोबत राहण्याबाबतही माैन सोडले. जया बच्चन यांच्याबद्दल भाष्य करणे यावेळी तिने टाळले.
बच्चन कुटुंबियांसोबत राहण्याचा अनुभव सांगताना ऐश्वर्या राय दिसली. ऐश्वर्या राय हिने दिलेली ही मुलाखत जुनी असून सध्या चर्चेत आलीये. ऐश्वर्या राय हिने देखील घटस्फोटाच्या चर्चांवर भाष्य करणे टाळले आहे. 2007 मध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेकने लग्न केले. अभिषेकने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विदेशात असताना ऐश्वर्या रायला प्रपोज केला. त्यानंतर काही दिवसांमध्येच तिने अभिषेक बच्चनसोबत लग्न केले.
सलमान खान याच्यासोबतच्या ब्रेकअपनंतर तिने अभिषेकला जीवनसाथी बनवले. विशेष म्हणजे दोघांनी अत्यंत शाही पद्धतीने लग्न केले. मात्र, दोघांच्या नात्याबद्दल काही दिवसांपासून विविध चर्चा या रंगताना दिसल्या. ऐश्वर्या राय कायमच मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत विदेशात जाताना दिसते. जास्त करून ती आराध्यासोबतच जाते. अभिषेक बच्चन याच्यासोबत फार कमी वेळेला ऐश्वर्या राय स्पॉट होताना दिसते. यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना एकप्रकारे उधाण आलंय. अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण नक्कीच आहे.