Gangubai Kathiyawadi : आलिया भटच्या ‘गंगूबाई काठियावाडी’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी सिनेमा प्रदर्शित होणार

| Updated on: Jan 28, 2022 | 12:11 PM

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटचा अजय देवगण यांची मुख्य भूमिका असलेला 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

Gangubai Kathiyawadi : आलिया भटच्या गंगूबाई काठियावाडीच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, या दिवशी सिनेमा प्रदर्शित होणार
आलिया भट-गंगूबाई काठियावाडी
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटचा ( Alia Bhat) अजय देवगण (Ajay Devgan ) यांची मुख्य भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ (Ggangubai Kathiyawadi) हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती. संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेला हा बिग बजेट सिनेमा सिनेरसिकांच्या उत्सुकतेचा विषय आहे. या सिनेमातील डायलॉग या सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. याआधी 6 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनामुळे (corona) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. पण आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. गंगूबाई काठियावाडी या चित्रपट येत्या 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

आलिया भटची या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे तर अजय देवगण गंगूबाईला बहीण मानणाऱ्या गँगस्टर करीम लालाच्या भूमिकेत दिसेल. 60 च्या दशकातील मुंबईतील महिला माफिया गंगूबाईच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. गंगूबाई मुंबईतल्या कामाठीपुरात कोठा चालवत होती. यावर हा सिनेमा आधारित आहे. हुसेन झैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकातील कथेवर आधारित या सिनेमाची पटकथा लिहिली आहे.

सिनेमाची गोष्ट

60 च्या दशकातील मुंबईतील महिला माफिया गंगूबाईच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. गंगूबाई मुंबईतल्या कामाठीपुरात कोठा चालवत होती. यावर हा सिनेमा आधारित आहे. हुसेन झैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकातील कथेवर आधारित या सिनेमाची पटकथा लिहिली आहे. या सिनेमातील आलियाची भूमिका चाहत्यांना आवडतेय. तिने साकारलेली ‘डॅशिंग, कॉन्फिडंट गंगूबाई’ प्रेक्षकांना भावतेय.

डायलॉगची चलती

या सिनेमातील डायलॉग हिट ठरताहेत. ‘गंगू चांद थी और चांदही रहेगी’, किसीसे जरने का नहीं हे डायलॉग सध्या हिट ठरत आहेत.

संबंधित बातम्या

वादग्रस्त विधानामुळे श्वेता तिवारी अडचणीत, हिंदूच्या भावना दुखावल्याचा आरोप; मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांची तक्रार

Why I Killed Gandhi : नथुराम गोडसेवर आधारित चित्रपट आक्षेपांच्या पिंजऱ्यात, ओटीटीवर रिलीज होणार की नाही?, ‘सर्वोच्च’ याचिका

साऊथची टॉप अभिनेत्री, गाणंही गाते, कम्पोजही करते, बॉलिवूडमध्येही नाव कमावलं, टॅलेंटेड श्रृतीचा हॅपी बर्थडे!