Why I Killed Gandhi : नथुराम गोडसेवर आधारित चित्रपट आक्षेपांच्या पिंजऱ्यात, ओटीटीवर रिलीज होणार की नाही?, ‘सर्वोच्च’ याचिका

Why I Killed Gandhi : नथुराम गोडसेवर आधारित चित्रपट आक्षेपांच्या पिंजऱ्यात, ओटीटीवर रिलीज होणार की नाही?, 'सर्वोच्च' याचिका
डॉ. अमोल कोल्हेंनी Why I Killed Gandhi सिनेमात नथूराम गोडसेची भूमिका साकारली आहे- फोटो- सिनेमातून

Why I Killed Gandhi हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार का? याबाबत शंका निर्माण झालीये. कारण हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Jan 28, 2022 | 11:09 AM

मुंबई : नथुराम गोडसेवर (Nathuram Godase) आधारित ‘Why I Killed Gandhi’ या चित्रपटाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसतायेत. हा चित्रपट दिवसेंदिवस वादाच्या चक्रव्युहात अडकतोय. ओटीटीवर (OTT) हा चित्रपट प्रदर्शित होणार का? याबाबत शंका निर्माण झालीये. कारण हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. ‘या चित्रपटाला सेंसॉर बोर्डने मंजुरी दिलेली नाही, त्यामुळे हा चित्रपट ओटीटीवर रिलीज केला जाऊ नये’, असं या याचिकेत म्हणण्यात आलं आहे. तसंच ‘हा चित्रपट गोडसेची महती गातो आणि गांधींजींची प्रतिमा मलीन करतो’, असं या याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे नथुराम गोडसेवर आधारित हा चित्रपट ओटीटीवर बघायला मिळणार का याबाबत शंका निर्माण आहे.

याचिकाकर्त्यांचं म्हणणं काय? 

अनुज भंडारी यांनी महात्मा गांधी आणि नथुराम गोडसेवर आधारित चित्रपटाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ‘या सिनेमात महात्मा गांधींची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि नथुराम गोडसेच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. या चित्रपटातून समाजात द्वेष पसरवण्याचा आणि शांतता भंग करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालावी’, असं या याचिकेत म्हणण्यात आलं आहे.

‘सेन्सॉर बोर्डाची परवानगी नाही’

सर्वोच्च न्यायातलायत दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत अनुज भंडारी यांनी या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने मंजुरी दिली नसल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे तो ओटीटीवर प्रदर्शित होऊ नये असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे.

सिनेमावरच्या आक्षेपांची मालिका

‘Why I Killed Gandhi’ या चित्रपटात राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका केली आहे. त्यावर काहींनी आक्षेप घेतला. तर काहींनी अमोल कोल्हे यांनी केवळ ती भूमिका केल्याचं म्हटलंय. स्वत: अमोल कोल्हे यांनी ‘मी केवळ गोडसेची भूमिका केली, मी त्याच्या विराचारांचं आणि त्याच्या कृतीचं समर्थन करत नाही’, असं म्हटलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला तर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मात्र अमोल कोल्हे यांनी नथुरामची भूमिका करण्याला विरोध केला.

संबंधित बातम्या

साऊथची टॉप अभिनेत्री, गाणंही गाते, कम्पोजही करते, बॉलिवूडमध्येही नाव कमावलं, टॅलेंटेड श्रृतीचा हॅपी बर्थडे!

Mahesh Manjrekar : महेश माजरेकरांच्या अडचणीत आणखी वाढ, चित्रपटातील दृश्य प्रकरण पोहोचलं कोर्टात

Ira Khan : आमीर खानची लेक म्हणते, पुन्हा रेड व्हायची वेळ आलीय, फातिमा सना शेखची कमेंट चर्चेत

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें