Ananya Panday : बाॅलिवूड इंडस्ट्रीबद्दल अनन्या पांडे हिचे हैराण करणारे विधान, ‘त्या’ चर्चांवर सोडले माैन
अनन्या पांडे हिचा काही दिवसांपूर्वीच ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट रिलीज झालाय. ड्रीम गर्ल 2 या चित्रपटामध्ये आयुष्मान खुराना हा मुख्य भूमिकेत दिसला. विशेष म्हणजे या चित्रपटाने धमाका केला. ड्रीम गर्ल 2 चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना अनन्या पांडे दिसली.

मुंबई : चंकी पांडे याची लेक अर्थात अनन्या पांडे (Ananya Panday) ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. मात्र, अनन्या पांडे ही तिच्या चित्रपटांमुळे नाही तर तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. अनन्या पांडे हिचा काही दिवसांपूर्वीच ड्रीम गर्ल 2 (Dream Girl 2) हा चित्रपट रिलीज झालाय. ड्रीम गर्ल 2 चित्रपटाने मोठा धमाका केला. ड्रीम गर्ल 2 चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाचे छाप प्रेक्षकांवर सोडण्यात अनन्या पांडे हिला यश मिळाले नाही. सर्वजण हे फक्त आणि फक्त आयुष्मान खुराना याच्याच अभिनयाचे काैतुक करताना दिसले.
ड्रीम गर्ल 2 च्या अगोदर अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांचा लाईगर हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा प्रेक्षकांना नक्कीच होत्या. मात्र, हा चित्रपट फ्लाॅप गेला. विशेष बाब म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन हे अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा हे करताना दिसले. शेवटी चित्रपटाच्या अपयशाचे खापर अनन्या पांडे हिच्यावरच फोडण्यात आले.
अनन्या पांडे ही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. एक चर्चा जोरदार रंगताना दिसत आहे की, अनन्या पांडे ही बाॅलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर याला डेट करतंय. इतकेच नाही तर यांचे काही फोटो देखील व्हायरल झाले. विदेशात आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे मस्त वेळ घालवताना दिसले. यांचे काही खास फोटोही व्हायरल झाले.
नुकताच अनन्या पांडे हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये अनन्या पांडे हिने काही खुलासे देखील केले आहेत. अनन्या पांडे म्हणाली की, मला ही इतर लोकांप्रमाणे माझ्या पर्सनल लाईफमध्ये काय सुरु आहे हे सांगायला आवडत नाही. मात्र, मी अशा इंडस्ट्रीमध्ये आहे जिथे ही गोष्टी अजिबातच शक्य नाहीये. लोक नेहमीच त्यावर भाष्य करताना दिसणार आहे. याप्रकारच्या अफवा तर कायमच उडत राहणार असेही म्हणताना अनन्या पांडे ही म्हणताना दिसलीये.
म्हणजेच अनन्या पांडे हिने या अफवा असल्याचे देखील म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच अनन्या पांडे ही आदित्य रॉय कपूर याच्यासोबत विदेशात जाताना दिसली. याचे काही फोटो आणि व्हिडीओही व्हायरल होताना दिसले. इतकेच नाही तर हे दोघे लवकरच साखरपुडा करणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र, अजूनही कधीच अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांनी त्यांच्या नात्यावर भाष्य केले नाहीये.
