AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, उद्या भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश, मुंबईमध्ये घडामोडींना वेग

राज्यात महापालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे, मात्र या निवडणुकांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश होणार आहे.

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, उद्या भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश, मुंबईमध्ये घडामोडींना वेग
uddhav thackerayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 25, 2026 | 9:34 PM
Share

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आधी नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुका पार पडल्या, त्यानंतर महापालिकांच्या निवडणुका झाल्या, आणि आता राज्यता निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान राज्यात जेव्हा नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांची घोषणा झाली होती, तेव्हा भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झाल्याचं पहायला मिळालं, शिवसेना ठाकरे गटाला देखील अनेक धक्के बसले, शिवसेना ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर महापालिका निवडणुकीची घोषणा झाली तेव्हा देखील हे चित्र फारसं बदललं नाही, महापालिका निवडणुकांमध्ये देखील अनेक जणांनी शिवसेना ठाकरे गट सोडला, काही जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर काही जणांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

निवडणुकींच्या तोंडावर होणारे पक्षप्रवेश आता शिवसेना ठाकरे गटासाठी डेकेदुखीचा विषय ठरला आहे, असे पक्षप्रवेश रोखणे हे शिवसेना ठाकरे गटासमोर मोठं आव्हान आहे. दरम्यान आता राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे, येत्या पाच फेब्रुवारी रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर सात तारखेला मतमोजणी होणार आहे. दरम्यान आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर देखील शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. सोमवारी भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश होणार आहे.

लातूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडलं आहे. औसा तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार दिनकरराव माने हे उद्या  आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजपच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश होणार आहे.  या पक्षप्रवेशामुळे भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांची औसा तालुक्यात ताकद वाढणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा पक्षप्रवेश झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.  दिनकरराव माने यांनी  204 मध्ये अभिमन्यू पवार यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती, हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Follow Us
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
Amit Shah : अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास; अखिलेश यादवांनी एका वाक्यात दिलं प्रत्युत्तर
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
Sushil Karad : वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; पीडित महिलेला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
Rahul Gandhi : आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार; संपूर्ण भाषण पाहा
नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव...
Tejashwi Yadav : नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव यांचा थेट सवाल
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
Eknath Shinde : शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी ग्वाही
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
Ram Purnekar : शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती; राम पूर्णेकर असं का म्हणाले?
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...
Tukaram Munde FDA : दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले लाडू-चिवडे; विक्रेत्यांना दिला इशारा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती