
अभिनेत्री कंगना राणावत हिने बॉलिवूडनंतर आपला मोर्चा हा राजकारणाकडे वळवलाय. विशेष म्हणजे मंडी येथून खासदार म्हणून कंगना राणावत निवडूनही आलीये. राजकारणासोबतच आपल्या आगामी चित्रपटामध्येही कंगना राणावत व्यस्त दिसत आहे. कंगना राणावत ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. कंगना राणावत सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. कंगना राणावत हिच्यासोबत खासदार झाल्यानंतर चंदीगड एअरपोर्टवर एक हैराण करणारी घटना घडली होती. थेट कंगना राणावत हिच्या कानाखाली मारण्यात आली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला.
सध्या सोशल मीडियावर कंगना राणावत हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून लोक कंगना राणावत हिला चांगलेच टार्गेट करताना देखील दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये कंगना राणावत ही चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिताना दिसत आहे. हेच वागणे कंगना राणावत हिचे लोकांना अजिबातच आवडले नसल्याचे दिसत आहे.
एकाने कमेंट करत म्हटले की, कंगना राणावत ही फक्त गरीब लोकांसोबत बोलते. मात्र, स्वत: बघा कसे चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिते. मुळात म्हणजे कंगना राणावत हिच्याकडून चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिण्याचे फायदेच आता सांगण्यात आले. कंगना राणावत हिने तशी एक पोस्टही सोशल मीडियावर शेअर केल्याचे बघायला मिळतंय.
कंगना राणावत हिने सांगितले की, चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिल्याने रोग दूर राहतात, विषारी गोष्टींपासून आपण सुरक्षित राहतो. विशेष म्हणजे चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिणे अत्यंत शुभ असते. अगोदरही कंगना राणावत हिने तिच्या चांदीच्या ग्लासची झलक दाखवली होती. यावरून एक चर्चा सुरू झालीये की, खरोखरच चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिणे शुभ असते का?
कंगना राणावत हिने बॉलिवूडमध्ये अत्यंत मोठा काळ गाजवला आहे. मात्र, नेहमीच बॉलिवूडच्या काही लोकांवर टीका करताना कंगना राणावत ही दिसते. कंगना राणावत हिने काही दिवसांपूर्वीच अभिनेता रणबीर कपूर याच्यावर जोरदार टीका केली होती. कंगना राणावत हिचे ते बोलणे ऐकून लोकांनाही मोठा धक्का बसला होता.