चारचौघात कानाखाली मारलेल्या महिलेवर कंगना राणावत प्रचंड संतापत म्हणाली, मर्डर नाही तर रेप….

कंगना राणावत ही कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. कंगना राणावत हिने नुकताच मंडीमधून लोकसभा निवडणूक लढवली आणि ती जिंकली देखील आहे. विमानतळावर कंगना राणावत हिच्यासोबत एक अत्यंत हैराण करणारी घटना घडलीये. या घटनेचे काही व्हिडीओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.

चारचौघात कानाखाली मारलेल्या महिलेवर कंगना राणावत प्रचंड संतापत म्हणाली, मर्डर नाही तर रेप....
Kangana Ranaut
| Updated on: Jun 08, 2024 | 5:50 PM

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने नुकताच लोकसभा निवडणूक मंडी येथून जिंकली आहे. कंगना राणावत हिने बाॅलिवूडला अनेक हिट चित्रपट दिली आहेत. आता बाॅलिवूडनंतर राजकारणात धमाल करताना कंगना राणावत दिसणार आहे. कंगना राणावत हिच्यासोबत एक अत्यंत हैराण करणारा प्रकार घडलाय. कंगना राणावत चंदीगडहून दिल्लीला निघाली असताना चक्क विमानतळावर तिच्या कानाखाली मारण्यात आली. खळबळजनक म्हणजे चक्क CISF च्या कर्मचारी महिलेने तिच्या कानाखाली मारली. या घटनेचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.

या सर्व घटनेनंतर कंगना राणावत हिच्या चाहत्यांमध्ये संताप बघायला मिळतोय. मात्र, दुसरीकडे काही लोक हे या CISF च्या कर्मचारी महिलेचे समर्थन करताना दिसत आहेत. बाॅलिवूडमधून तिला चक्क मोठी ऑफर देखील आलीये. ही महिला पंजाब येथील शेतकरी आंदोलनाला सपोर्ट करत होती आणि त्या रागामधूनच तिने कंगनाच्या कानाखाली मारली.फक्त कानाखालीच नाही तर या महिलेने कंगना राणावत हिला शिवीगाळ देखील केलाय.

जे लोक या CISF च्या कर्मचारी महिलेने समर्थन करत आहेत आणि तिने जे केले ते योग्यच केले म्हणत आहेत, अशांना आता खडेबोल सुनावताना कंगना राणावत ही दिसली आहे. कंगना राणावत हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, प्रत्येक बलात्कारी, खुनी आणि चोर यांच्याकडे देखील गुन्हे करण्याची नेहमीच एक मजबूत भावनिक, आर्थिक, शारीरिक आणि मानसिक कारणे असतील.

मुळात म्हणजे कोणताही गुन्हा विनाकारण घडत नाही, तरीही त्यांना दोषी ठरवून जेलची शिक्षा दिली जाते. जर तुम्ही सर्व कायदे मोडणाऱ्या आणि गुन्हे करणाऱ्या गुन्हेगाराच्या भावनेशी संबंधित असाल तुम्ही ठीक असाल तर लक्षात ठेवा जर कोणी दुसऱ्याच्या इंटिमेट झोनमध्ये शिरला परवानगीशिवाय त्यांच्या शरीराला स्पर्श केला आणि त्यांचे शोषण केले, तर तुम्ही बलात्कार आणि खूनही योग्य समजता.

पुढे कंगना राणावत हिने लिहिले की, तुम्ही तुमच्या मनोवैज्ञानिक गुन्हेगारी प्रवृत्तींचा खोलवर विचार केला पाहिजे. मी तुम्हाला नक्कीच योग आणि ध्यान यासारख्या गोष्टी करण्याचा सल्ला देईन. नाही तर तुमचे आयुष्य एक कटू आणि बोझिल अनुभव बनेल. आता कंगना राणावत हिची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. लोक मोठ्या प्रमाणात यावर कमेंट करताना दिसत आहेत.