Manish Koirala : आई होण्यासाठी आता…, मनिषाने का नाही घेतला दुसऱ्या लग्नाचा निर्णय? श्रीमंत उद्योजकासोबत लग्न केलं पण…

Manish Koirala : अभिनेत्री मनिषा कोईराला कायमं तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीने लग्न तर केलं, पण वैवाहिक आयुष्याचा आनंद अभिनेत्रीला फार काळ घेता आलं नाही. अभिनेत्रीने आई होण्याच्या निर्णयावर देखील मोठं वक्तव्य केलं होतं.

Manish Koirala : आई होण्यासाठी आता..., मनिषाने का नाही घेतला दुसऱ्या लग्नाचा निर्णय? श्रीमंत उद्योजकासोबत लग्न केलं पण...
अभिनेत्री मनिषा कोईराला
| Updated on: Aug 16, 2026 | 2:51 PM

Manish Koirala : एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्री मनिषा कोईराला हिने फक्त बॉलिवूडच नाही तर, चाहत्यांच्या मनावर देखील राज्य केलं. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत मनिषाने चाहत्यांचं मनोरंजन केलं. बॉलिवूडमध्ये करियर करत असताना अभिनेत्रीच्या रिलेशनशिप आणि अफेअरच्या देखील चर्चा रंगल्या. अभिनेत्रीने लग्न तर केलं. पण तिचं लग्न फार काळ काही टिकलं नाही. दरम्यान अभिनेत्रीने एका मुलाखतीत, आई होण्याच्या निर्णयावर देखील मोठं वक्तव्य केलं होतं… सांगायचं झालं तर, आज अभिनेत्रीचा वाढदिवस असल्यामुळे सर्वत्र तिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगील आहे.

एका मुलाखतीत मनिषा स्वतः म्हणालेला, ‘कुटुंब सुरु करण्यासाठी आता थोडा उशीर झाला आहे? कधी कधी असा देखील विचार करते, माझा जोडीदार असता तर माझं आयुष्य खरंच चांगलं असतं? पण मला असं वाटतं की, माझं आयुष्य पूर्ण झालं आहे. माझी मुलं माझे डॉग आणि मांजर मोगली आणि सिम्बा आहे. महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे कमाल आई – वडील आहेत.’

‘चांगल्या मित्रांची मला साथ आहे… पण आजही मला वाटकं की, पार्टनर असणं खरंच चांगलं आहे का? मला माहिती आहे ती, मुलांना सांभाळणं फार जबाबदारीचं नाव आहे. त्यासाठी तुम्हाला जबाबदार होणं फार गरजेचं आहे. ज्या दिवशी मला आत्मविश्वास होईल की, मी सिंगल मदर म्हणून मुलाचा सांभाळ करू शकते, तेव्हा मी करेल…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या आवडी वेगळ्या आहेत . मला माझं आयुष्य जगायला आवडतं आणि मी आजही मजेशीर माझं आयुष्य जगत आहे. जर आई होण्यासाठी मी या सर्व गोष्टींचा त्याग करु शकली तर मी नक्कीच करेल…’, असं देखील अभिनेत्री एका मुलाखतीत म्हणाली.

मनिषा कोईराला हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लग्न करण्यापूर्वी 12 सेलिब्रिटींना डेट केलं. पण कोणासोबतच अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अभिनेत्रीच्या नावाची चर्चा दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत देखील रंगली. आजही दोघांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगत असतात.

अभिनेत्रीने 2010 मध्ये नेपाळी उद्योजक सम्राट दहल याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या 2 वर्षांनंतर मनिषा आणि सम्राट यांचा घटस्फोट झाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us