AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांची दोन तीन वर्ष बदली करू नका, थेट सरकारकडे मागणी

तुकाराम मुंढे यांची देशभरात चर्चा सुरु आहे. अन्न भेसळ करणाऱ्यांवर धडाधड कारवाई सध्या महाराष्ट्रात सुरु आहे. यामुळेच तुकाराम मुंढे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता तुकाराम मुंढे बद्दल थेट सरकारकडे एक विनंती करण्यात आली आहे.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांची दोन तीन वर्ष बदली करू नका, थेट सरकारकडे मागणी
| Updated on: Aug 16, 2026 | 2:45 PM
Share

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात फक्त एकाच नावाची चर्चा सुरु आहे. तुकाराम मुंढे यांच्याकडे जेव्हापासून महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) च्या आयुक्तपदाची जबाबदारी आली आहे तेव्हापासूबन देशात अन्नसभेसळ करणाऱ्यांच्या मनात धस्स झालं आहे. त्यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर भेसळ करणाऱ्यांवर ताबडतोब कारवाई सुरू केली. त्यांच्या या कृतीमुळे अन्न व्यवसायात सर्रास भेसळ करणारे लोक हादरले आहेत. तुकाराम मुंढे यांची त्यांच्या निर्भीड कामाच्या पद्धतीमुळे अनेकदा बदली होत असते. तर आता अनेक सेलिब्रिटी लोकांनी त्यांची बदली होऊ नये अशी विनंती केली आहे. आता Seers Fund Management Pvt. Ltd. चे चिफ इन्वेसमेंट ऑफिसर चांदेर भाटिया यांनी एक विधान केले आहे.

चांदेर भाटिया यांनी ट्विट करत तुकाराम मुंढेबद्दल एक विनंती केली आहे. ते म्हणाले की, “महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे की, श्री. तुकाराम मुंडे यांची किमान 2-3 वर्षे बदली करू नये. नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध छापे टाकणे, तपासणी करणे आणि कारवाई करणे यांद्वारे ते उत्कृष्ट काम करत आहेत. भारतीय नागरिक म्हणून आपल्याला भेसळमुक्त, सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, एफडीए (FDA) मधील श्री. तुकाराम मुंडे यांच्या या चांगल्या कामाचा प्रभाव पडून इतर राज्यांमधील एफडीए विभागांनाही नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची प्रेरणा मिळू शकते.”

तुकाराम मुंढे यांची बदली करु नका अशी विनंती बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. सोशल मीडियावरही अनेक लोक त्यांच्या समर्थनात व्हिडिओ बनवत आहे आणि सरकारकडे विनंती करत आहे की यांची बदली करु नका.

Follow Us
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
SC Reservation : निर्णय झाला, पण अंमलबजावणी कुठे? अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
S. Chockalingam : मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
Shweta Mahale : बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; श्वेता महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार?; भायखळा ते....
Thackeray Brothers : 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार? राज-उद्धव ठाकरे 11.30 वाजता पत्रकार परिषद घेणार; भायखळा ते...
धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून..
Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून...., नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...
Mahayuti : एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...; शिवसेना आमदाराने सगळंच सांगून टाकलं
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
Thakurli : उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न! वाळवी, पाणी अन्.... रहिवाशांचा संताप
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले