AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटीच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन; खास फोटो शेअर करत म्हणाली…

अभिनेत्री आलिया भट्ट, सोनम कपूर, बिपाशा बासू यांच्या घरी गेल्या वर्षी नव्या पाहुण्याचं आगमन झाल्यानंतर, 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री देखील वयाच्या ३९ व्या वर्षी झाली आई...

प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटीच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन; खास फोटो शेअर करत म्हणाली...
| Updated on: May 12, 2023 | 3:45 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड विश्वातून अनेक आनंदाच्या बातम्या समोर येत आहेत. काही सेलिब्रिटी लग्न करत आहेत, तर काही सेलिब्रिटींच्या घरी नव्या पाहु्ण्याचं आगमन झालं आहे. अभिनेत्री आलिया भट्ट, सोनम कपूर, बिपाशा बासू यांच्या घरी गेल्या वर्षा नव्या पाहुण्याचं आगमन झालं. आता बॉलिवूडच्या आणखी एका प्रसिद्ध सेलिब्रिटीच्या घरी पाळणा हलला आहे. अभिनेत्री गौहर खान (Gauahar Khan) हिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सध्या सर्वत्र गौहर खान आणि तिच्या बाळाची चर्चा रंगली आहे. गौहर खान हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करच चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. सध्या गौहर खान हिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

गौहर खान आणि पती झैद दरबार (Gauahar Khan & husband Zaid Darbar) यांनी त्यांच्या बाळाचं मोठ्या थाटात स्वागत केलं आहे. १० मे रोजी गौहर हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. गौहर खान आणि पती झैद दरबार यांच पहिलं बाळ आहे. इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली आहे. पण अभिनेत्रीने बाळाचा चेहरा दाखवलेला नाही.

गौहर खान आणि झैद यांनी त्यांच्या कुटुंबात नवीन सदस्याचे स्वागत करतानाचा उत्साह एका पोस्टद्वारे शेअर केला. या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटींनी त्यांचं अभिनंदन करण्यास सुरुवात केली. चाहते बाळाचं नाव आणि त्याला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. गौहर कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

View this post on Instagram

A post shared by Gauahar Khan (@gauaharkhan)

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. एवढंच नाही तर आई होणार असल्याची माहिती देखील अभिनेत्री सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत दिली होती. आता देखील अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत आनंद शेअर केला आहे…

गौहर खान आणि पती झैद दरबार यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांना २०२० साली लग्न केलं. दोघांमध्ये १२ वर्षांचं अंतर आहे. झैद पत्नी गौहर हिच्यापेक्षा १२ वर्षांनी लहना आहे. लग्नानंतर २०२२ साली अभिनेत्री आई होणार असल्याची घोषणा केली. अभिनेत्री सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे.

गोहर खान हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस’मुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर अभिनेत्रीने २००९ साली प्रदर्शित झालेल्या ‘रॉकेट सिंह: सेल्समॅन ऑफ द ईयर’ सिनेमातून करियरला सुरुवात केली. त्यानंतर गौहर  अनेक सिनेमे आणि वेब सीरिजमध्ये देखील झळकली होती.

हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.