हेमा मालिनी यांनी केला धर्मेंद्र यांच्या इच्छेबद्दल मोठा खुलासा, म्हणाल्या, त्यांनी तयारीही..

बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या जोडीने एक काळ बॉलिवूडमध्ये गाजवला. हेमा मालिनी यांच्यासोबत पहिले लग्न झालेले असताना धर्मेंद्र यांनी लग्न केले. आता धर्मेंद्र यांच्या इच्छेबद्दल बोलताना हेमा मालिनी दिसल्या आहेत.

हेमा मालिनी यांनी केला धर्मेंद्र यांच्या इच्छेबद्दल मोठा खुलासा, म्हणाल्या, त्यांनी तयारीही..
Hema Malini
| Updated on: Dec 12, 2025 | 9:54 AM

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन 24 नोव्हेंबर 2025 रोजी झाले. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर 27 नोव्हेंबर रोजी मुंबईतील हॉटेलमध्ये देओल कुटुंबियांनी प्रार्थना सभा घेतली. मात्र, या प्रार्थना सभेपासून हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन्ही मुलींना दूर ठेवले. देओल कुटुंबियांच्या शोक सभेत अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. धर्मेंद्र यांच्या जाण्याने देओल कुटुंबिय जवळ आल्याचे सांगितले जात होते. मात्र, हेमा मालिनी आणि त्यांच्या मुलींची गैरहजरी बरेच काही सांगून जाताना दिसली. हेमा मालिनी यांनी दिल्लीमध्ये धर्मेंद्र यांच्या शोक सभेचे आयोजन केले. यावेळी हेमा मालिनी काही आठवणी सांगताना दिसल्या. यावेळी त्यांनी धर्मेंद्र यांनी अपूर्ण राहिलेली अच्छाही बोलून दाखवली.

धर्मेंद्र यांच्या आठवणी मंचावर उभे राहून ज्यावेळी हेमा मालिनी सांगत होत्या, त्यावेळी त्यांच्या दोन्ही लेकी त्यांच्यासोबत खंबीरपणे उभ्या होत्या. यावेळी हेमा मालिनी यांचे बोलणे ऐकून अहाना देओल रडताना दिसली. यावेळी ईशा देओल बहिणीला सांभाळताना दिसली. अहाना देओलचे अश्रू थांबण्याचे अजिबातच नाव घेत नव्हते. अहान सतत रडताना दिसली.

यावेळी धर्मेंद्र यांच्याबद्दल बोलताना हेमा मालिनी यांनी म्हटले की, धर्मेंद्र यांचे एक स्वप्न पूर्ण झाले नाही. आम्ही सर्वजण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तयारी करत असताना हे घडले. मी कायमच त्यांना म्हणत की, तुम्ही इतके छान लिहिता मग तुम्ही तुमचे पुस्तक प्रकाशित केले पाहिजे. तुमच्यावर प्रेम करणारे अनेकजण आहेत. तुमच्या चाहत्यांना हे आवडेल… माझे बोलणे ऐकून ते सीरिअस झाले.

त्यांना ते करायचे होते. त्यांना त्यांचे पुस्तक प्रकाशित करायचे होते. ते तयारीलाही लागले होते. पण त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले, त्यांचे ते काम अपूर्ण राहिले. यापूर्वीही याबद्दल बोलताना हेमा मालिनी दिसल्या होत्या. धर्मेंद्र शायरी देखील करत. धर्मेंद्र यांचे लग्न 1954 मध्ये प्रकाश काैर यांच्यासोबत झाले. प्रकाश काैर आणि धर्मेंद्र यांचे चार मुले आहेत. 1980 मध्ये दुसरी लग्न घटस्फोट न घेता हेमा मालिनी यांच्यासोबत धर्मेद्र यांनी केले. त्यांना दोन मुली आहेत.