Dharmendra Death : देओल कुटुंबाने दूर ठेवल्यानंतर हेमा मालिनी यांचा मोठा निर्णय
Dharmendra Death : अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर कुटुंबियांसह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. निधनानंतर शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. जेथे हेमा मालिनी आणि दोन मुली दिसल्या नाहीत, आता हेमा मालिनी यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

Dharmendra Death : बॉलिवूडचे दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. 24 नोव्हेंबर 2025 मध्ये धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतल्यानंतर 27 नोव्हेंबर रोजी देओल कुटुंबियांनी शोक सभेचं आयोजन करण्यात आलं. शोक सभेत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आणि धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली… पण देओल कुटुंबियांनी आयोजित केलेल्या शोकसभेत हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली ईशा आणि अहाना देओल नव्हत्या. देओल कुटुंबियांनी दूर ठेवल्यानंतर हेमा मालिनी यांनी देखील मोठा निर्णय घेतला आहे.
देओल कुटुंबियांच्या शोक सभेनंतर हेमा मालिनी यांनी देखील धर्मेंद्र यांच्यासाठी शोक सभेचं आयोजन केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हेमा मालिनी, ईशा देओल, अहाना देओल, भरत तख्तानी आणि वैभव वोहरा यांनी शोकसभेचं आयोजन केलं आहे. 11 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 4.00 ते 6.00 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलं आहे. धर्मेंद्र यांच्यासाठी डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र, जनपथ, नवी दिल्ली येथे प्रार्थना सभा आयोजित केली जाईल.
View this post on Instagram
27 नोव्हेंबर रोजी मुंबईतील ताज लँड्स एंड येथे झालेल्या पहिल्या प्रार्थना सभेचे आयोजन देओल कुटुंबाने केलं होतं आणि चित्रपटसृष्टीतील लोकांनी मोठी गर्दी केली होती. शोक सभेत सोनू निगम यांचा म्यूजिकल सेगमेंट देखील सादर करण्यात आला, ज्यामध्ये त्यांनी धर्मेंद्र यांची काही आवडती गाणी गायली.
‘आ जा जाने वाले’, ‘रहें ना रहें हम’, ‘आज मौसम बड़ा बेईमान है’, आणि ‘अपने तो अपने होते हैं’ यांसारखी गाणी सोनू निगम यांनी गायली. शोक सभेत सलमान खान, ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, अक्षय कुमार, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, टाइगर श्रॉफ, विद्या बालन, आर्यन खान, विवेक ओबेरॉय, सुरेश ओबेरॉय उपस्थित राहिले होते.
अनेक सेलिब्रिटी ताज लँड्स एंडला गेले होते, तर काहींनी वैयक्तिकरित्या हेमा मालिनी यांच्या मुंबईतील घरी जाऊन त्यांच्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. महिमा चौधरी, फरदीन खान आणि सुनीता आहूजा यांचा मुलगा यशवर्धन उपस्थित होते.
दिल्ली शोक सभेपूर्वी, हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या घरी गीता पठण केलं. दरम्यान, सनी देओल आणि बॉबी देओल यांनी 8 डिसेंबर रोजी धर्मेंद्र यांचा ९० वा वाढदिवस चाहत्यांसह घरी साजरा केला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांची चर्चा सुरु आहे.
