बोलके डोळे, निरागस चेहरा, बॉलिवूडमध्ये बबली गर्ल नावाने प्रसिद्ध, या अभिनेत्रीला ओळखलं का?

kriti sanon : 'बरेली की बर्फी', 'पानिपत', 'लुका छुपी' यासह अनेक चित्रपटांमध्ये क्रितीने आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावर क्रितीची फॅन फॉलोअर्स खूप आहेत.

बोलके डोळे, निरागस चेहरा, बॉलिवूडमध्ये बबली गर्ल नावाने प्रसिद्ध, या अभिनेत्रीला ओळखलं का?
क्रिती सेनन
| Edited By: | Updated on: Jan 22, 2022 | 5:25 PM

मुंबई : बॉलिवूडमधील अभिनेते तसंच अभिनेत्री त्यांच्या स्टाईल आणि फॅशन सेन्समुळे कामय चर्चेत असतात. चाहतेही त्यांच्या स्टाईलने प्रभावित होऊन त्यांच्यासारखीच स्टाईल करण्याचा, त्यांना फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. अलीकडे सोशल मीडियाच्या ट्रेंडनुसार, कलाकार बालपणीचा फोटो शेअर करतात. त्याद्वारे ते आपल्या चाहत्यांना आपल्या आयुष्यातील अनेक क्षणांचं साक्षीदार करण्याच्या प्रयत्नात असतात. आता सोशल मीडियावर एका सुंदर अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो व्हायरल होतोय. तिच्या बोलक्या डोळ्यांनी आणि निरागस चेहऱ्याने ती लगेच ओळखू येतीये.

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. साधना कट हेअरस्टाइलमध्ये उभी असलेली ही मुलगी खांद्यावर टेडी बेअर घेऊन आहे. खट्याळ हसणारी ही मुलगी कॅमेऱ्यात पोज देताना खूपच गोंडस दिसत आहे. हा फोटो आहे ‘हिरोपंथी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारी अभिनेत्री क्रिती सेनन हिचा…!

‘बरेली की बर्फी’, ‘पानिपत’, ‘लुका छुपी’ यासह अनेक चित्रपटांमध्ये क्रितीने आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावर क्रितीची फॅन फॉलोअर्स खूप आहेत. ती अनेकदा तिचे विविध पोझेसमधले फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिच्या बालपणीची झलक पाहून तिच्या चाहत्यांना त्याचं सुंदर बालपण आठवलं असेल, हे मात्र नक्की!

क्रिती आज जितकी सुंदर आणि फिट दिसते, तितकीच ती लहानपणीही गोंडस होती. क्रिती सध्या वरुण धवनसोबत ‘भेडिया’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. याशिवाय कार्तिक आर्यनसोबत ‘शेहजादा’, टायगर श्रॉफसोबत ‘गणपथ’ आणि प्रभाससोबत ‘आदिपुरुष’ आणि अक्षय कुमारसोबत ‘बच्चन पांडे’ चित्रपटात क्रिती दिसणार आहेत.

संबंधित बातम्या़

Rohilee’s wedding Photo : लाडात थोडं गोड होऊनी मिठीत येणार का, जुईली-रोहितच्या लग्नाची धूम

‘गेहराईयाँ’ च्या प्रमोशनसाठी अनन्या पांडेचं नवं फोटोशूट, फोटो सोशल मीडियावर शेअर

प्रियंका चोप्रा झाली आई! ‘या’ अब्जाधीशाच्या पत्नीनं सरोगसीद्वारे 22 मुलांना दिला जन्म