प्रियंका चोप्रा झाली आई! ‘या’ अब्जाधीशाच्या पत्नीनं सरोगसीद्वारे 22 मुलांना दिला जन्म

प्रियंका चोप्रा (Priyanka chopra) आई बनली आहे आणि निक जोनास (Nick Jonas) वडील. प्रियंका चोप्रा सरोगसी (Surrogacy) तंत्राद्वारे आई बनली आहे. अब्जाधीशाच्या पत्नीनं सरोगसीद्वारे 22 मुलांना जन्म दिला आहे.

प्रियंका चोप्रा झाली आई! 'या' अब्जाधीशाच्या पत्नीनं सरोगसीद्वारे 22 मुलांना दिला जन्म
मुलांसह क्रिस्टीना ओझतुर्क (सौ. इन्स्टाग्राम)
Follow us
| Updated on: Jan 22, 2022 | 4:00 PM

प्रियंका चोप्रा (Priyanka chopra) आई बनली आहे आणि निक जोनास (Nick Jonas) वडील… प्रियंका चोप्रा सरोगसी (Surrogacy) तंत्राद्वारे आई बनली आहे. पण या तंत्रापूर्वीही अनेक नामवंत सेलिब्रिटी पालक बनले आहेत. अब्जाधीशाच्या पत्नीनं सरोगसीद्वारे 22 मुलांना जन्म दिला आहे. याचा उल्लेख त्यांच्या इन्स्टाग्राम बायोवरही करण्यात आला आहे. तिला सरोगसीनं 105 मुलांना जन्म द्यायचा आहे.  क्रिस्टीना ओझतुर्क (Kristina Ozturk) असं या महिलेचं नाव आहे. महिलेचं वय 24 वर्षे आहे. ती रशियाची राजधानी मॉस्को इथं राहते. या महिलेनं अवघ्या एका वर्षात 21 सरोगेट बाळांना जन्म दिला. अलीकडेच तिनं आणखी एका मुलाला जन्म दिला आहे, म्हणजे एकूण 22.

10 मार्च 2020 रोजी झाला पहिल्या मुलाचा जन्म

‘डेली मेल’नं गेल्या वर्षी या महिलेबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. महिलेनं आपल्या मुलांसाठी 16 आयांना नेमलं आहे. ज्यावर 12 महिन्यांचा खर्च £67,700 (सुमारे 68 लाख रुपये) येतो. क्रिस्टीनाचा 57 वर्षांचा पती, गॅलिप ओझतुर्क (Galip Ozturk) हा व्यवसायाने हॉटेल व्यावसायिक आहे. जॉर्जियामध्ये दोघांची भेट झाली. क्रिस्टीनाला सरोगसीद्वारे 105 मुलं जन्माला घालायची आहेत. या महिलेच्या पहिल्या मुलाचा जन्म 10 मार्च 2020 रोजी झाला.

खर्च केले सुमारे 68 लाख

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, मार्च 2020 ते जुलै 2021दरम्यान, सरोगसीवर £142,000 (सुमारे 1 कोटी 43 लाख रुपये) खर्च करण्यात आला आहे. त्याचवेळी मुलांना पाहण्यासाठी त्यांच्या आयांववर त्यांनी सुमारे 68 लाख रुपये खर्च केले आहेत. क्रिस्टीना तिच्या मुलांवर आणि फक्त डायपर आणि इतर गरजांसाठी आठवड्याला £4,000 (रु. 4 लाख) खर्च करते.

अनेक सेलिब्रिटी बनले आहेत पालक

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास सरोगसीच्या माध्यमातून पालक बनले आहेत. दोघांनी 2018मध्ये लग्न केलं होतं. सरोगसी तंत्राच्या मदतीनं आई होणारी प्रियंका चोप्रा ही एकमेव बॉलिवूड सेलिब्रिटी नाही. त्याच्या आधी शाहरुख खान, आमिर खान, प्रीती झिंटा, शिल्पा शेट्टी, करण जोहर, एकता कपूर आणि तुषार कपूर यांसारखे अनेक स्टार्सही सरोगसीच्या मदतीनं पालक बनले आहेत.

धोका पत्करत कसं काढलं शेळीच्या पिल्लाला खड्ड्यातून बाहेर? Video Viral

Viral Video : मिठू मिठू नाही, कडू कडू बोलतोय हा पोपट! मग मुलीनंही चांगलंच झापलं..!

Ramp Walk असाही! मावळात भरला बैलांचा भव्य रॅम्प वॉक; पाहा, कोण जिंकलं..?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.