AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धोका पत्करत कसं काढलं शेळीच्या पिल्लाला खड्ड्यातून बाहेर? Video Viral

आता एक व्हिडिओ (Video) समोर आला आहे, ज्यामध्ये एका बकरी(Goat)च्या पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी एका व्यक्तीनं स्वतःचा जीव कसा धोक्यात टाकला, हे दिसून येतंय.

धोका पत्करत कसं काढलं शेळीच्या पिल्लाला खड्ड्यातून बाहेर? Video Viral
शेळीच्या पिलाला वाचवताना युवक
| Updated on: Jan 22, 2022 | 3:33 PM
Share

माणुसकीपेक्षा मोठं काहीही नाही, असं म्हणतात. सोशल मीडिया (Social Media) हे एक असं व्यासपीठ आहे जिथं असे अनेक व्हिडिओ (Video) पाहायला मिळतात, ज्यात लोक माणुसकीचं उदाहरण समोर ठेवताना दिसतात. हे व्हिडिओ इंटरनेटवर येताच व्हायरल होतात, लोक त्यांच्या लाइक्स आणि कमेंट्सद्वारे त्यांना दाद देतात. आता एक व्हिडिओ (Video) समोर आला आहे, ज्यामध्ये एका बकरी(Goat)च्या पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी एका व्यक्तीनं स्वतःचा जीव कसा धोक्यात टाकला, हे दिसून येतंय. शेळीच्या पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी या व्यक्तीनं काय केलं, ते पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

करत आहेत कौतुक

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वजण या व्यक्तीचं कौतुक करत आहेत आणि त्याला सलाम करत आहेत. लोक व्हिडिओवर इमोजी देखील शेअर करत आहेत.

गेला खड्ड्यात

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक खोल आणि अतिशय अरुंद खड्डा दिसत आहे आणि काही लोक त्याजवळ उभे आहेत. खड्ड्यात वरून काहीही दिसत नाही. खाली पडलेला एक माणूस त्या खड्ड्यात डोकावत आहे, मग त्यानं आपले दोन्ही हात खड्ड्यात घातले आणि त्याच्या मागे दोन लोक त्याचे दोन्ही पाय पकडून त्याला उलटे खड्ड्यात टाकत आहेत. त्या माणसाचं अर्ध्याहून अधिक शरीर खड्ड्यात गेलं आणि काही क्षणांनंतर बाहेर उभ्या असलेल्या दोन माणसांनी त्याचा पाय धरला आणि त्याला मागे ओढू लागले आणि ती व्यक्ती हातात बकरीचं पिल्लू घेऊन बाहेर पडते.

ट्विटरवर शेअर

हा व्हिडिओ खरंच आश्चर्यकारक आहे. एवढ्या खोल खड्ड्यात जाऊन त्या व्यक्तीनं बकरीच्या पिल्लाला ज्या प्रकारे बाहेर काढलं, त्या खड्ड्यात श्वास घेणंही कठीण झालं असेल, हे तुम्हाला लक्षात येईल. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांच्या पेजवर तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता. या व्हिडिओवर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. एका यूझरनं कमेंटमध्ये लिहिलंय, की हे खरं प्रेम आहे. दुसर्‍या यूझरनं लिहिलंय, की हा व्हिडिओ खरोखरच सुंदर आहे.

Viral Video : मिठू मिठू नाही, कडू कडू बोलतोय हा पोपट! मग मुलीनंही चांगलंच झापलं..!

Ramp Walk असाही! मावळात भरला बैलांचा भव्य रॅम्प वॉक; पाहा, कोण जिंकलं..?

Video : लढवली अनोखी शक्कल आणि भागवली आपली तहान; पाहा, या कावळ्यानं कसं चालवलं डोकं…

सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.