Viral Video : मिठू मिठू नाही, कडू कडू बोलतोय हा पोपट! मग मुलीनंही चांगलंच झापलं..!

Viral Video : मिठू मिठू नाही, कडू कडू बोलतोय हा पोपट! मग मुलीनंही चांगलंच झापलं..!
पोपट

कधीतरी आपल्याला बोलणारा पोपट कुठेतरी दिसतो. एक पोपट (Parrot) आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. हा पोपट अक्षरश: वाद घालताना तुम्हाला दिसून येईल. हा व्हिडिओ (Video) आता व्हायरल (Viral) होत आहे.

प्रदीप गरड

|

Jan 22, 2022 | 1:43 PM

मुंबई : जवा नवीन पोपट (Parrot) हा, लागला मिठू मिठू बोलायला… हे प्रसिद्ध गाणं तुम्ही अनेकवेळा ऐकलं असेल. गाणं ऐकलं असलं तरी प्रत्यक्ष पोपटाला मिठू मिठू बोलताना किती लोकांनी ऐकलं हे मात्र कुणीही सांगू शकत नाही. अनेकजण पोपटाला पाळत असतात. मग त्याची काळजी घेण्यापासून त्याला बोलायलाही शिकवलं जातं. कधीतरी आपल्याला असा बोलणारा पोपट कुठेतरी दिसतो. असाच एक पोपट (Parrot) आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. हा पोपट अक्षरश: वाद घालताना तुम्हाला दिसून येईल. हा व्हिडिओ (Video) आता व्हायरल (Viral) होत आहे.

‘पप्पांना तू का ओरडून बोललीस?’

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी घरच्या पोपटाला खडसावत आहे. तू आवाज नको वाढवू. तुझं वय काय, माझं वय काय, असं ती मुलगी म्हणतेय. पप्पांना तू का ओरडून बोललीस, असा प्रश्न ती पोपटाला करताना दिसून येतंय. विशेष म्हणजे मुलगी रागवत असताना ही मादी पोपपटी काही मागे नसते. तीही तिला जोरदार प्रत्तुत्तर देतेय.

भाषा समजत नाही

पोपट मुलीला कोणत्या भाषेत बोलतं ते काही समजून येत नाही, मात्र मुलगी त्या पोपटाला झापत असल्याचं आपल्याला ऐकू येईल. लहान आहेस ना, मग लहानासारखीच वाग. मी तुझ्याएवढी आहे का, असं म्हणत ती रागवत आहे. काहीही खाते. खाण्याआधी तोंडही धूत नाही, घाणेरडी कुठली, असं मुलगी तिला खडसावतेय. या मादी पोपटाला मात्र मुलीचे आरोप काही मान्य नाहीत, आणि त्यामुळे तीची तिला दोन हात करतेय.

होतोय व्हायरल

हा व्हिडिओ कुठला आहे, हे कळू शकलेलं नाही. मात्र प्रचंड प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पक्ष्यांशी काही माणसं किती एकरूप होतात, याचंही हे उदाहरण म्हणावं लागेल.

Ramp Walk असाही! मावळात भरला बैलांचा भव्य रॅम्प वॉक; पाहा, कोण जिंकलं..?

Video : लढवली अनोखी शक्कल आणि भागवली आपली तहान; पाहा, या कावळ्यानं कसं चालवलं डोकं…

Video : बाप रे..! 14 फुटांच्या अजगरासह 100हून अधिक सापांनी घेरलं, काय झालं त्या व्यक्तीचं?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें