
बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना अभिनेत्रींना अनेकदा चढ – उतारांचा सामना करावा लागतो. पूर्वी करीयर नष्ट होईल या भीतीने अभिनेत्री शांत राहायच्या. पण काळ पूर्णपणे बदलाल आहे. अभिनेत्री पुढे येत त्यांच्यासोबत घडलेल्या वाईट घटना चाहत्यांसोबत शेअर करत असतात. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मौसमी चॅटर्जी आहे.
मौसमी चॅटर्जी यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं पण त्यांनी कधीच मोठ्या पडद्यावर स्विमसूट आणि तोकडे कपडे घातले नाहीत. मोठ्या पडद्यावर तोकडे कपडे घालणं मौसमी चॅटर्जी यांना देखील कधी पटलं नाही. यावर मौसमी चॅटर्जी यांनी अनेकदा स्वतःचं मत देखील मांडलं आहे.
तोकडे कपडे आवडत नसल्यामुळे मौसमी चॅटर्जी यांनी कायम साडी आणि पारंपरिक ड्रेसमध्ये शूट केलं. एवढंच नाही तर, त्यांनी कधी डीप नेक ब्लाउज देखील घालण्यास होकार दिला नाही. ‘गुड्डी’ सिनेमातून मौसमी चॅटर्जी यांना एकाच कारणामुळे काढण्यात आलं कारण त्यांनी सिनेमात स्कर्ट घालण्यास नकार दिला.
मौसमी चॅटर्जी यांच्या वक्तव्यानुसार, वयाच्या 13 व्या वर्षापासून मौसमी चॅटर्जी यांनी साडी नेसण्यास सुरुवात केली. मौसमी चॅटर्जी म्हणाल्या, ‘एकदा कॉस्ट्यूम डिझायनर मणि जे रबाडी यांनी मला सिनेमासाठी बॅकलेस ब्लाऊज आणि छोटा घागरा दिला होता.’
‘बॅकलेस ब्लाऊज आणि छोटा घागरा पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हा मला असं वाटलं की मी निर्वस्त्र झाली आहे…’ असं खुद्द मौसमी चॅटर्जी म्हणाल्या होत्या. आजही मौसमी चॅटर्जी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.
सांगायचं झालं तर, 2019 मध्ये मौसमी चॅटर्जी एका महिला अँकरवर भडकल्या होत्या. महिला अँकर पँट घातल्यामुळे मौसमी चॅटर्जी यांनी संताप व्यक्त केलेला. ‘तुम्ही असे कपडे घालून आलात, जे चांगले दिसत नाहीत…. तुम्हाला चुडीदार, कुर्ता किंवा साडी नेसायला हवी होती…’ असं मौसमी चॅटर्जी महिला अँकरला म्हणाल्या होत्या. मौसमी चॅटर्जी त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.