AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी भारताची सेक्स सिम्बॉल…, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वक्तव्याने उडाली खळबळ, म्हणाली, ‘अभिनय येत नव्हता म्हणून…’

स्वतःला भारताची सेक्स सिम्बॉल म्हणणाऱ्या बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य, म्हणाली, 'मला अभिनय नव्हता म्हणून मी...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीचीच चर्चा...

मी भारताची सेक्स सिम्बॉल..., प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वक्तव्याने उडाली खळबळ, म्हणाली, 'अभिनय येत नव्हता म्हणून...'
| Updated on: May 18, 2026 | 11:06 AM
Share

90 च्या दशकात अशा अनेक अभिनेत्री होऊन गेल्या आहेत, ज्यांनी ग्लॅमर आणि स्टाईलच्या जोरावर लोकांच्या मनावर राज्य केलं आहे. तो काळ असा होता जेव्हा, अभिनयासोबतच, लूक्स आणि पर्सनालिटी देखील फार महत्त्वाची होती. काही अभिनेत्रींनी स्वतःला इंडस्ट्रीमध्ये टिकवून ठेवलं तर अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडला राम राम ठोकला. पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत 90 च्या दशकातील अभिनेत्रीने एक धक्कादायक खुलासा केला आहे… फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा फार कमी अभिनेत्री आहेत, ज्यांनी करियरच्या पीकवर असताना बॉलिवूडचा निरोप घेतला, अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री पूजा बेदी.

पूजा हिने फार कमी वयात मॉडेलिंगची सुरुवात केली. अभिनेत्रीने 1991 साली प्रदर्शित झालेल्या ‘विष्कानी’ सिनेमातून अभिनयास सुरुवात केला. तेव्हा अभिनेत्रीला ‘सेक्स सिम्बॉल’ असं नाव देण्यात आलं. पण फक्त चार वर्ष काम केल्यानंतर अभिनेत्रीने लग्न केलं आणि बॉलिवूडचा निरोप घेतला. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत पूजा म्हणाली, ‘माझ्या आईने मला एक महत्त्वाची गोष्ट शिकवली आहे आणि ती म्हणजे, जे काम करशील, त्या कामामध्ये 100 दे नाही तर, ते काम करुच नको… मी सिनेमांमध्ये होते आणि खरं तर, मी उत्तम अभिनेत्री नव्हती… पण सेक्सी दिसण्यात मी खूप चांगली होता. त्यामध्ये मी 100 टक्के चांगली होती.. मला भारताचा सेक्स सिम्बॉल देखील म्हटलं जात होतं.’

अभिनेत्रीने उघडपणे कबूल केलं की, तिला वाटायचं की ती अभिनयात चांगली नाही, त्यामुळे तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बनण्याची प्रेरणा कधीच मिळाली नाही. पूजा म्हणाली की, लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी ती क्लीवेज दाखवायची… असं देखील अभिनेत्री म्हणाली.

एवढंच नाही तर, यावेळी अभिनेत्री तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं. ‘एक अनुभव आणि प्रवास आहे… मी माझ्या दोन मुलांसाठी त्यांची आभारी आहे… मला नाही माहिती त्यांच्याशिवाय आयुष्य कसं असेल, मी त्यांच्यावर प्रचंड प्रेम करते. या लग्नातून मला एका चांगला मित्र भेटला आहे… माझे पूर्व पती आजही माझे चांगले मित्र आहेत.’

पुढे अभिनेत्रीने मान्य केलं की, तिने आयुष्यात अनेक चुका केल्या. पण लग्न कधीच तिच्या आयुष्यातील चूक नव्हती. पूजा हिची मुलगा अलाया 5 वर्षांची आणि मुलगा दोन वर्षांचा असताना अभिनेत्रीचा घटस्फोट झाला. पूजा हिने 1994 मध्ये फरहान फर्नीचरवाला याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी 2003 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

Follow Us
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी 6 आरोपींना अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक
अमरावती रुग्णालय आग प्रकरण; चौकशी प्रमुखांवर सुषमा अंधारेंचा संताप
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आग प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी संजय काटकरांना खडसावले
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
"बॅनर A-1, पण रस्ता स्पेस टेक्नॉलॉजीचा"; ठाकरेंचा भरत गोगावलेंन टोला
आदित्य ठाकरेंचा सवाल:
सुटे तेल बंदीवरून वाद, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना
सुटे तेल बंदी: आठवडी बाजारांना फटका, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना
इंधनानंतर आता साखरेसाठीही रांगा? महाराष्ट्रात साखरेचा तुटवडा...
इंधनानंतर आता साखरेसाठीही रांगा? महाराष्ट्रात साखरेचा तुटवडा आणि वाढते दर चिंतेचा विषय
थकीत बिलांमुळे कंत्राटदाराचा बळी, वडेट्टीवारांनी सरकारवर साधल निशाणा
गजानन देवकते प्रकरण: थकलेल्या बिलांमुळे कंत्राटदाराचा बळी, विजय वडेट्टीवारांनी सरकारवर साधला निशाणा.
प्रवाशांचा जीव धोक्यात! कसारा घाटात भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर...
प्रवाशांचा जीव धोक्यात! कसारा घाटात भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर व्यस्त
MPSC FDA पेपरफुटी: अभिमन्यू पवारांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी
औषध निरीक्षक परीक्षा रद्द: पेपरफुटीमागे कोण?
एका प्रियकरामुळे हजारो विद्यार्थ्यांना फटका
MPSC FDA पेपरफुटी प्रकरणात लव्ह स्टोरीचा धक्कादायक अँगल