Rani Mukerji | ‘पतीसोबत वाद होतात कारण…’, राणी मुखर्जी हिच्या वैवाहिक आयुष्याचं सत्य समोर
Rani Mukerji | रणी मुखर्जी हिचे पती सोबत कायम होत असतात वाद, अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीकडून वैवाहिक आयुष्याचं सत्य समोर... सध्या सर्वत्र राणी हिच्या खासगी आयुष्याची चर्चा

मुंबई : 7 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री राणी मुखर्जी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एका मोठ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. एक काळ असा होता जेव्हा राणी फक्त आणि फक्त तिच्या सिनेमांमुळे चर्चेत असायची. पण आता राणी तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. एक मुलाखतीत राणी हिने पतीसोबत सतत होत असलेल्या भांडणांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे. राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण लग्नानंतर अभिनेत्री वैवाहिक आयुष्यातील मोठं सत्य सांगितलं आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत राणी हिने पती आदित्य चोप्रा यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री नेहा धुपिया हिने चॅट शोमध्ये ‘पतीसोबत वाद होतात का?’ असा प्रश्न विचारला… यावर राणी हिने नात्याबद्दल स्पष्ट वक्तव्य केलं. ज्यामुळे राणी चर्चेत आली.
राणी म्हणाली, ‘मी कायम माझ्या पतीसोबत भांडत असते.. रोज आमचे वाद होतात. पण माझे पती इतक्या प्रेमाने सर्व गोष्टी करतात ज्यामुळे मी त्यांना कायम बोलत असते. आमच्या कुटुंबात जेव्हा वाद होतात ते प्रेमाने होतात. आम्ही कधीही कोणावर रागवत नाही. आमच्यात भांडणं होतात. पण आम्ही एकमेकांवर प्रचंड प्रेम करतो…’ असं देखील राणी म्हणाली..
राणी हिने मुलगी आदिरा हिच्याबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं.
मुलीबद्दल राणी म्हणाली, ‘मला असं वाटतं एका सामान्य मुलीप्रमाणे आदिरा हिचं आयुष्य असायला हवं. सेलिब्रिटी किड्स असल्यामुळे आयुष्यात काहीही न करता त्यांना लोकप्रियता मिळते. शाळेत देखील आदिरा हिला सामान्य मुलीप्रमाणे वागणूक द्यावी अशी माझी इच्छा आहे… तिचे फोटो काढण्यासाठी अनेकांची गर्दी व्हावी असं मला आणि आदित्यला बिलकूल वाटत नाही..’ असं देखील अभिनेत्री म्हणाली…
राणी मुखर्जी हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. एक काळ असा होता जेव्हा फक्त आणि फक्त राणी मुखर्जी हिच्या अभिनयाची आणि सौंदर्याची चर्चा असायची. बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत अभिनेत्रीने काम केलं आहे.
