60 कोटींच्या फसवणुकीमध्ये शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या, थेट कंपनीतील कर्मचारी…

शिल्पा शेट्टी मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहेत. शिल्पा आणि तिचा पती राज कुंद्रा देश सोडून बाहेर जाऊ शकत नाहीत. आता त्यांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत.

60 कोटींच्या फसवणुकीमध्ये शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या, थेट कंपनीतील कर्मचारी...
Shilpa Shetty and Raj Kundra
| Updated on: Nov 06, 2025 | 1:51 PM

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. हेच नाही तर कोर्टाने शिल्पाला विदेशात जाण्यास देखील मनाई केली. शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्यावर तब्बल 60 कोटींच्या फसवणुकीचा आरोप आहे. सध्या हे प्रकरण कोर्टात सुरू असून त्यांना देश सोडण्यास सक्त मनाई आहे. एका व्यावसायिकाने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. हेच नाही तर याचा तपास सध्या सुरू असून शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणी चांगल्याच वाढल्याचे बघायला मिळतंय. आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) शिल्पाच्या कंपनीतील चार माजी कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे.

यापैकी एका कर्मचाऱ्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे, तर उर्वरित तिघांची चौकशी अद्याप बाकी आहे. हे चारही लोक पूर्वी बेस्ट डील प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीत काम करत होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, कंपनीचा एक कर्मचारी आधीच गुन्हे शाखेत हजर झाला आहे आणि त्याने त्याचे म्हणणे आम्हाला सांगितले. हे चौघेही पूर्वी बेस्ट डील प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीत काम करत होते.

तीन कर्मचाऱ्यांना लवकरच चाैकशीसाठी बोलावले जाईल. तपास पथकाकडून राज कुंद्राच्या कंपनीची चाैकशी केली जातंय. कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चाैकशी केली जात आहे. या कर्मचाऱ्यांना राज कुंद्राकडून पगार नेमकी कशी दिली जात होती. हे लोक नेमके काम काय करायचे? या सर्वांची चाैकशी केली जाणार आहे. कंपनीकडे पैसा नेमका कुठून येत होता? ऑफिस फर्निचरसाठी तब्बल 20 लाख रूपये खर्च करण्यात आल्याची माहिती देखील पुढे येतंय.

हे 20 लाख नेमके कुठून आले, याचा तपास केला जात आहे. अजून काही लोकांची फसवणूक शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या कंपनीने केली का? याचा देखील शोध घेतला जात आहे. काही वर्षांपूर्वीच राज कुंद्राला जेलमध्ये राहण्याची वेळ आली होती. यादरम्यान शिल्पा शेट्टी राज कुंद्राला घटस्फोट देणार असल्याचीही जोरदार चर्चा रंगताना दिसली.