शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याचं धर्माबद्दल मोठं वक्तव्य, अभिनेत्री म्हणते, ‘तो आता लायनीवर आलाय…’

माझा नवरा आता लाईनीवर आलाय..., राज कुंद्रा बद्दल असं काय बोलून गेली शिल्पा... त्याने देखील स्वतःच्या धर्मावर केलं मोठं वक्तव्य..., सध्या सर्वत्र फक्त शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची चर्चा...

शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याचं धर्माबद्दल मोठं वक्तव्य, अभिनेत्री म्हणते, तो आता लायनीवर आलाय...
अभिनेत्री शिल्पा शेट्टी
| Updated on: Apr 25, 2026 | 9:35 AM

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला आज कोणत्याच वेगळ्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. गेल्या काही वर्षांपासून शिल्पा बॉलिवूडपासून दूर आहे, पण अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील शिल्पा पती राज कुंद्रा याच्यामुळे चर्चेत आली आहे. नुकताच, राज याने स्वतःचं खासगी आयुष्य आणि अध्यात्माबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सांगायचं झालं तर, राज याला पांढरा पगडीमध्ये स्पॉट करण्यात आलं… ज्यामुळे राज याला विचारण्यात आलं की, ‘शीख धर्मचं पालन करत आहेस, तर यावर शिल्पाची प्रतिक्रिया काय आहे…?’ यावर राज कुंद्रा याने मजेदार उत्तर दिलं… शिल्पाबद्दल राज म्हणाला, ‘ती प्रत्येक परंपरा जोपासते आणि देवावर तिच्या विश्वास आहे..’

शिल्पा शेट्टी प्रतिक्रियेबद्दल बोलताना राज म्हणाला, ‘तिला हेसुद्धा माहीत नव्हतं की एके काळी मी जवळजवळ नास्तिक होतो. देवावर माझा बिलकूल विश्वास नव्हता… आपल्या कर्मांवर सर्वकाही आधारित आहे… असं मला वाटत होतं आणि त्याच पद्धतीने मी आयुष्य जगत होतो. पण जेव्हा मी अध्यात्माकडे वळलो शीख धर्माचं पालन करु लागलो… तेव्हा शिल्पा म्हणाली, ‘माझा नवरा आता लाईनीवर आलाय’ ती आनंदी आहे… शिल्पा सर्व धर्मांचं पालन करते… सर्व परंपरा जोपासते… मी हिंदू प्रथा फॉलो करतो… पण शीख धर्माने जो आपलेपणा दिला आहे, त्याच कारणामुळे मी आज याठिकाणी आहे…’, असं देखील राज कुंद्रा म्हणाला.

शिल्पा आणि राज यांचं नातं…

राज याच्यासोबत लग्न करण्यापूर्वी अनेक बॉलिवूड अभिनेत्यांसोबत शिल्पा हिच्या नावाची चर्चा रंगली. पण राज कुंद्रा याची आयुष्यात एन्ट्री झाल्यानंतर अभिनेत्री त्याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. जवळपास 2 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर राज आणि शिल्पा यांनी 22 नोव्हेंबर 2009 मध्ये लग्न केलं… तेव्हा दोघांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरलेला.

फार कमी लोकांंना महिती आहे की, शिल्पा हिच्यासोबत राज याचं दुसरं लग्न आहे. राज याचं पहिलं लग्न कविता नावाच्या एका महिलेसोबत झालेलं. दोघांना एक मुलगी देखील आहे. पण राज आणि कविता यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय  घेतला. आज राज दुसरी पत्नी शिल्पा आणि दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

Follow Us