Tv9 Marathi Special Report | मराठी सक्तीवरून वाद पेटला; अविनाश जाधव-सदावर्ते आमने-सामने, अमित ठाकरे यांचा इशारा काय?
मराठी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापत असताना वकील गुणरत्न सदावर्ते आणि मनसे यांच्यातील वाद अधिकच चिघळताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी सदावर्ते यांना थेट आव्हान दिलं आहे. “जर एका बापाची औलाद असाल तर 4 मे रोजी मीरा भाईंदरमध्ये येऊन दाखवा,” असा इशारा त्यांनी दिला. जाधव यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना सदावर्ते यांनीही आक्रमक भूमिका घेत आव्हान स्वीकारलं आहे.
मराठी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापत असताना वकील गुणरत्न सदावर्ते आणि मनसे यांच्यातील वाद अधिकच चिघळताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी सदावर्ते यांना थेट आव्हान दिलं आहे. “जर एका बापाची औलाद असाल तर 4 मे रोजी मीरा भाईंदरमध्ये येऊन दाखवा,” असा इशारा त्यांनी दिला. जाधव यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना सदावर्ते यांनीही आक्रमक भूमिका घेत आव्हान स्वीकारलं आहे. “मनसेच्या धमक्यांना घाबरणारा मी नाही, मीरा भाईंदरला कधीही येईन,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, रिक्षा-टॅक्सी चालकांच्या संभाव्य संपाच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून आणखी कठोर भूमिका घेण्यात आली आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी इशारा देत, “संपावेळी मराठी रिक्षाचालकांना अडवणाऱ्यांना मनसे स्टाईलने धडा शिकवू,” असं वक्तव्य केलं आहे. या सर्व घडामोडींमुळे मराठी भाषा सक्तीचा मुद्दा अधिकच तीव्र बनला असून, 4 मे रोजी मीरा भाईंदरमध्ये नेमकं काय घडणार, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
Published on: Apr 25, 2026 09:46 AM
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! वरुण धवनची पोस्ट
26 दिवसांचं उपोषण संपलं! वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी

