तर आनंद दिघेंनी निरुपम यांच्या कानाखाली खेचली असती… एकनाथ शिंदे मात्र… मनसेचं थेट आव्हान काय?
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मराठी सक्तीला विरोध करणाऱ्या संजय निरुपम यांच्यावर टीका करत सवाल उपस्थित केला. “मराठी शिकण्यावरून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना काही अडचण नाही, मग संजय निरुपम यांना नेमकी काय अडचण आहे?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यासोबतच देशपांडे यांनी अधिक आक्रमक भूमिका घेत, “आज आनंद दिघे असते तर त्यांनी निरुपम यांना कानशिलात लगावली असती, किंवा एकनाथ शिंदे यांनी तरी त्यांना धडा शिकवावा,” असं वक्तव्य केलं.
मुंबईसह महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्ती करण्याच्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापलं आहे. या निर्णयामुळे विविध राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, हा मुद्दा सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मराठी सक्तीला विरोध करणाऱ्या संजय निरुपम यांच्यावर टीका करत सवाल उपस्थित केला. “मराठी शिकण्यावरून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना काही अडचण नाही, मग संजय निरुपम यांना नेमकी काय अडचण आहे?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यासोबतच देशपांडे यांनी अधिक आक्रमक भूमिका घेत, “आज आनंद दिघे असते तर त्यांनी निरुपम यांना कानशिलात लगावली असती, किंवा एकनाथ शिंदे यांनी तरी त्यांना धडा शिकवावा,” असं वक्तव्य केलं.
या वक्तव्यामुळे मराठी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादाला आणखी धार मिळाली असून, राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on: Apr 25, 2026 10:41 AM
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें