AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजलं ना…आप पक्षाच्या फुटीवर राऊतांची खरमरीत टीका… म्हणाले, अचानक हे लोक होलसेलमध्ये….

Sanajay Raut on Raghav Chadha-AAP-BJP: आप पक्षातील फुटीवर खासदार संजय राऊत यांनी खणखणीत टोलेबाजी केली आहे. त्यांनी भाजपवर टीका केली. तर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे का भारताला नरक म्हणाले हे आता समजलंय ना, असा टोलाही लगावला...

Sanjay Raut : ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजलं ना...आप पक्षाच्या फुटीवर राऊतांची खरमरीत टीका... म्हणाले, अचानक हे लोक होलसेलमध्ये....
संजय राऊतImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 25, 2026 | 11:18 AM
Share

Sanajay Raut on Raghav Chadha-AAP-BJP: आप पक्षातील सात खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राजधानातील या घाडमोडींनी एकच खळबळ उडाली आहे. हे सर्व खासदार पंजाबमधून आलेले आहेत. त्यावर आज खासदार संजय राऊत यांनी तोंडसूख घेतले. त्यांनी यावेळी भाजपवर सडकून टीका केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताला नरक का म्हणाले हे आता समजलं ना, अशी बोचरी टीका त्यांनी या पक्ष फुटीवर केली. तर आम्ही सामान्य नागरीक आहोत, आम्हाला पुन्हा तुरुंगात टाकले तरी घाबरणार नाही असे आवाहन ही त्यांनी भाजपला दिले.

मग गुंडांच्या पक्षात कसे गेले?

राज्यसभेतील सात खासदार जे पंजाबमधून राज्यसभेवर आलेत. त्यात राघव चड्ढा, संजय मित्तल, संजय पाठक अजून काही नावं आहेत. भारतीय जनता पार्टी ही देशात राजकारण करत आहे. भाजप निर्लज्ज झाली आहे. तिने लाज सोडली आहे. राघव चड्ढासारखे काही लोक माझेही मित्र होते. कालपर्यंत राघव चड्ढा हे भाजपला गुंडांचा पक्ष म्हणत होते. भाजप हा गुंड आणि भ्रष्ट लोकांचा पक्ष आहे हे राघव चड्ढा सुद्धा म्हणत होते. संजय मित्तल आणि संजय पाठक आणि इतरही खासदार म्हणत होते. आता हे सर्व लोक होलसेलमध्ये गुंडांच्या पक्षात गेले. आपने संजय मित्तल यांना राघव चड्ढा यांच्याऐवजी राज्यसभेत पक्षाचा उपनेता केले, त्याने मला पण धक्का बसला. तेव्हा मित्तल आनंदी होते. अचानक त्यांच्या काही संस्थांवर ईडीची कारवाई झाली. ईडीचे छापे पडले आणि राजकीय भूकंप झाला याकडे त्यांनी लक्ष वेधले.

भाजप हा बकासूर

महाभारतात बकासूर नावाचा राक्षण होता त्यांची कधी पोट भरत नाही, तशी हे भाजप झाली. भाजपाने सुद्धा त्यांच्यावर टिका केली होती, ढोंगी होते आता काय झाला. ट्रम्प म्हणाले होते नरक झाला आहे तर हे भाजपने भारताला नरक बनवले आहे. नरक असलेल्या पार्टीत हे खासदार गेले आहे त्यांच्या सर्वांच्या लक्षात येईल. आमच्यावर सुद्धा प्रयत्न झाले, मात्र आम्ही घाबरलो नाही. मला अटक केली, तुम्ही पार्टी सोडा, मात्र मी पार्टी सोडली नाही. हे लोक जास्त संपत्ती आहे, म्हणून हे लोक घाबरतात त्यांना संरक्षण आहे. आम्ही रस्त्यावर लोक आहे आमचं काय वाकडं करणार. हे लोक देशात घाण पसरवत आहे. भाजपाचं टंम्पिंग ग्राऊंड झाली आहे. बकासूर यांनी पुन्हा जन्म घेतला आहे, तो भाजप झाला आहे. मात्र ह्यांच्या सुद्धा अंत आहे. उद्धव ठाकरे हे दु:खी आहे, सुनावणी होत नाही, संविधाची हत्या झाली तर सुद्धा सुनावणी होत नाही. मग काय आम्ही बागेश्वेशर महाराजाकडे जायचं? असा टोलाही त्यांनी लगावला.

बागेश्वर बाबांना आमचा वकील करावा लागेल

निवडणुक आयोग आणि न्यायालयाडून न्यायाची अपेक्षा नाही. आम्हाला बागेश्वर बाबाकडे न्याय मागावा लागेल, आणि त्यांना आमचा वकील करावा लागेल. साडेचार वर्षे झाली तर सुनावणी होत नाही, घटनेची हत्या झाली तुम्ही आमचं म्हणणे ऐकत नाही.अस कोणतं काम तुम्ही करताय आम्हाला कळू द्या, असा टोला राऊतांनी न्यायपालिकेला लगावला.

Follow Us
हि शान कोणाची? लालबागच्या राजाची; राजाचं प्रथम दर्शन! व्हिडिओ बघाच
हि शान कोणाची? लालबागच्या राजाची; राजाचं प्रथम दर्शन! संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच
ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल!
BRICS Summit 2026 | ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल! आज पंतप्रधान मोदींसोबत काय होणार चर्चा?
KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
KDMC Doctor Marhan Case | KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?