श्रद्धा कपूर हिचे रिलेशनशिपबद्दल अत्यंत मोठे भाष्य, म्हणाली, बॉयफ्रेंड…

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. श्रद्धा कपूरची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. श्रद्धा कपूर ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही श्रद्धा कपूर दिसते. आता श्रद्धा कपूर हिच्याकडून मोठा खुलासा करण्यात आलाय.

श्रद्धा कपूर हिचे रिलेशनशिपबद्दल अत्यंत मोठे भाष्य, म्हणाली, बॉयफ्रेंड...
Shraddha Kapoor
| Updated on: Oct 20, 2024 | 12:55 PM

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. काही दिवसांपूर्वीच श्रद्धा कपूर हिचा स्त्री 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे श्रद्धा कपूरचा हा चित्रपट धमाका करताना दिसला. श्रद्धा कपूर हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत आणि तिच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद मिळताना देखील दिसतोय. श्रद्धा कपूर ही अत्यंत मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. हेच नाही तर श्रद्धा कपूरचे मुंबईमध्ये आलिशान असे घर देखील आहे. श्रद्धा कपूर सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना ती दिसते.

श्रद्धा कपूर हिने नुकताच मोठा खुलासा केलाय. श्रद्धा कपूर हिला रिलेशनशिपबद्दल विचारण्यात आले. श्रद्धा कपूरला विचारण्यात आले की, आयुष्यात आशिकी 2 सारखा राहुल जयकर याच्यासारखा व्यक्ती तुझ्या आयुष्यात आला तर काय करशील. या प्रश्नावर अगदी थेट पणे उत्तर देताना श्रद्धा कपूर ही दिसली. आता श्रद्धा कपूरच्या विधानाची चर्चा होतंय.

श्रद्धा कपूर म्हणाली की, राहुल जयकर याच्यासारख्या व्यक्तीची काहीच समस्या नाहीये. समस्या आहे ती म्हणजे त्याच्या दारूची. हा पण असा कोणी व्यक्ती माझ्या आयुष्यात येत असेल तर मी आयुष्याला वाचवण्यासाठी मी दुसऱ्या दिशेला धावेल. मी असेल म्हणेल की, बाहेर पडण्याचा मार्ग कोणता आहे पळा…म्हणजेच काय तर श्रद्धा कपूरला तिचा बॉयफ्रेंड दारू पिणारा नकोय.

काही दिवसांपूर्वीच एक मुलाखत श्रद्धा कपूर हिने दिली. या मुलाखतीमध्ये श्रद्धा कपूर ही पहिल्यांदाच आपल्या रिलेशनशिपबद्दल बोलताना दिसली. हेच नाही तर तिने आपल्या बॉयफ्रेंडबद्दलही मोठा खुलासा केला. श्रद्धा कपूर म्हणाली होती की, मला माझ्या पार्टनरसोबत वेळ घालवण्यास आवडतो.

मी त्याच्यासोबत डिनरला जाते, शॉपिंगला जाते. त्याच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवते असे श्रद्धा कपूर हिने म्हटले होते. विशेष म्हणजे या मुलाखतीमध्ये श्रद्धा कपूर ही आपल्या लग्नाबद्दल बोलताना देखील दिसलीये. श्रद्धा कपूर ही म्हणाली की, मी सध्या माझ्या कामावर लक्ष देत आहे. त्यामुळे सध्याच माझा लग्न करण्याचा कोणताच विचार नाहीये. आपल्या लग्नाबद्दल स्पष्टपणे बोलताना श्रद्धा कपूर ही दिसलीये.