AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला भीती वाटू लागली, हृदय जोरजोरात धडकू लागले; कुवैतमध्ये अडकली अभिनेत्री, सांगितली भयानक परिस्थिती

बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री कुवैतमध्ये अडकली आहे. तिने भारतात परत येताना सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तेथील भयानक परिस्थिती सांगितली आहे. ती नेमकं काय म्हणाली जाणून घ्या...

मला भीती वाटू लागली, हृदय जोरजोरात धडकू लागले; कुवैतमध्ये अडकली अभिनेत्री, सांगितली भयानक परिस्थिती
बॉलिवूड अभिनेत्रीImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 10, 2026 | 1:50 PM
Share

मिडल ईस्टमधील सध्याच्या नाजूक परिस्थितीत अनेक ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले सुरू आहेत. अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानवर हल्ला केला. त्यानंतर इराण आता अमेरिकेची अनेक लष्करी तळे उद्ध्वस्त करताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री कुवेतमध्ये अडकली होती. मात्र, आता ती सुरक्षितपणे भारतात परतली आहे. परतल्यानंतर तिने तेथील भयानक परिस्थिती सांगितली आहे. ही अभिनेत्री कोण? कुवैतमध्ये सध्याची परिस्थिती कशी आहे? वाचा…

इराणवर इजरायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यानंतर संपूर्ण मिडल ईस्टमध्ये तणावाचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. या युद्धाच्या स्थितीत उर्वशी रौतेला कुवेतमध्ये अडकली होती. पण कसेबसे ती तिथून जीव वाचवून निघाली. उर्वशीने इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करून तेथे नेमकं काय घडलं हे सांगितले आहे.

काय आहे उर्वशीची पोस्ट?

युद्धाच्या परिस्थितीत कुवेतमधून निघताना उर्वशीने इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर केली आणि चाहत्यांना तेथील परिस्थितीची माहिती दिली आहे. अभिनेत्रीने सांगितले की, भारताकडे जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बसताना त्यांना खूप भीती वाटली. त्या रडू लागल्या होत्या आणि डोळे पुसताना दिसल्या. आपल्या भावना व्यक्त करताना उर्वशीने पोस्टमध्ये लिहिले, “प्लेनमध्ये बसण्यापर्यंत मी पूर्णपणे ठीक होते, पण जसजशी मी सेटल झाले, तसतसे अचानक मला भीती वाटू लागली, घाबरायला लागले आणि माझे हृदय जोरजोरात धडकू लागले. मला माहित नाही का, पण अचानक मला खूप भीती वाटली.”

पुढे तिने लिहिले की, “मी थोडी असुरक्षित आणि चिंतेत आहे. मला खरोखर तुमच्या प्रार्थनांची गरज आहे. जर माझ्या गोष्टी भावुक वाटल्या किंवा तुम्हाला काही चिंता वाटली तर मी माफी मागते, मला फक्त वाटले की माझ्या मनातील गोष्ट शेअर करावी. या वेळी तुमच्या दुआ आणि सपोर्टचा मला खूप आधार आहे.”

भारतात सुरक्षित परतली उर्वशी

उर्वशी आता सुरक्षित भारतात परतली आहे. अहवालानुसार, कठीण परिस्थितीत सुखरूप परतल्याबद्दल अभिनेत्रीने स्थानिक अधिकाऱ्यांचे आणि विमानतळ कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. रिपोर्ट्सनुसार, उर्वशी व्यावसायिक कामासाठी कुवेतला गेल्या होत्या. मात्र, मिडल ईस्टमधील अचानक बिघडलेल्या परिस्थितीमुळे ती तिथे अडकली होती. तरीही, आता ती भारतात परतली असून पूर्णपणे सुरक्षित आणि ठीक आहेत.

Follow Us
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम