AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी इंडस्ट्रीतून तुला बाहेर काढेल… अमीषा पटेलला असं का म्हणाला होता संजय दत्त?

Ameesha Patel | संजय दत्त याला अमीषा पटेल हिला का करायचं होतं इंडस्ट्रीतून बाहेर? अभिनेत्रीने एका मुलाखतीत केला मोठा खुलासा... अमीषा पटेल बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे अभिनेत्री कायम असते चर्चेत...

मी इंडस्ट्रीतून तुला बाहेर काढेल... अमीषा पटेलला असं का म्हणाला होता संजय दत्त?
| Updated on: Jun 09, 2024 | 3:27 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. पण अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आज अमीषा पटेल हिचा वाढदिवस आहे. ज्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली आहे. एका मुलाखतीत अमीषा हिने अभिनेता संजय दत्त याच्याबद्दल मोठा खुलासा केला होता. गेल्या 20 वर्षांपासून संजय दत्त अभिनेत्रीसाठी एक काम करत आहे. पण आजपर्यंत ते काम पूर्ण झालं नाही. रिपोर्टनुसार, अमीषा पटेल हिच्यासाठी जोडीदार शोधण्याचं काम संजय दत्त करत आहे.

एका मुलाखतीत अमीषा म्हणाली होती, ‘संजू माझ्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे आहे.संजय मला नेहमी म्हणतो, अमीषा तू या इंडस्ट्रीसाठी खूप चांगली आहेस, मी तुला या इंडस्ट्रीतून बाहेर काढेल. तू खूप साधी आहेस, खूप निरागस आहेस… मी तुझं लग्न करून देईन. अमीषा पुढे म्हणते, तो सर्वांना सांगतो की, जर तुम्हाला अमीषाचे मन जिंकायचे असेल तर तिच्याशी चांगले वागा.’

एवढंच नाहीतर, संजय दत्त याने काही मुलं देखील पाहिली होती. पण अभिनेत्रीने सर्वांना नकार दिला. ‘संजय दत्त याला माझं कन्यादान करायचं आहे. शिवाय माझ्या मुलांसोबत संजूबाबाला खेळायचं देखील आहे…’ पण आयुष्यात आलेल्या अनुभवांनंतर अमीषा हिने लग्न केलं नाही.

वयाच्या 48 व्या वर्षी देखील अभिनेत्री एकटी आहे. पैसा, प्रसिद्धी, संपत्ती सर्वकाही असून देखील अभिनेत्री एकटीच आयुष्य जगते. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. दरम्यान रिलेशनशिपबद्दल देखील अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं होतं.

रिलेशनशिपबद्दल कायम म्हणाली होती अमीषा?

‘माझे दोन रिलेशनशिप होते. त्याच कारणामुळे माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट उद्ध्वस्त झाली. याच कारणामुळे 12 – 13 वर्षांपासून माझ्याकडे कोणत्या पुरुषाचं प्रेम नाही… मी आनंदाने जगत आहेत मला आता काहीही नको. चित्रपटसृष्टीत सिंगल राहण्याचा दर्जा कायम ठेवला तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरते.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली….

अमीषा आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Follow Us
शिंदे यांची धावपळ आणि... शिवसेना पक्षाची सुनावणी सुरु होण्याआधीच बड्या
शिंदे यांची धावपळ आणि... शिवसेना पक्षाची सुनावणी सुरु होण्याआधीच बड्या नेत्याचं मोठं विधान
सुनेत्रा पवारांचे अध्यक्षपद खरंच अवैध? सचिदानंद सिंह यांची पुन्हा रिमा
सुनेत्रा पवारांचे अध्यक्षपद खरंच अवैध? सचिदानंद सिंह यांची पुन्हा रिमाईंडर नोटीस, आता...
मूळ शिवसेना कुणाची? 7 दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल कोणत्या वळणावर?
मूळ शिवसेना कुणाची? 7 दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल कोणत्या वळणावर? आज ठाकरेंचे वकील...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर भलत्याच चर्चांना उधाण, 3 तासांच्या बैठकीत...
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं विधान
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं सुचक वक्तव्य, अखेर मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठ विधान
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेतील अपात्रतेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठं विधान; काय म्हणाले?
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल,
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल, अमृता फडणवीसांनाही म्हणाले...
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे...
Pocket Money Scheme : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे म्हणाले..
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत...
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत डॉ. सूरदास यांनी काय काय सांगितलं?
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'