
चित्रपटसृष्टीत कास्टिंग काउच आता फारच सामान्य आहे. या विचित्र अनुभवाबद्दल अनेक अभिनेत्रींनी उघडपणे आपलं मत मांडलं आहे. मल्लिका शेरावतपासून अंकिता लोखंडेपर्यंतच्या नावांचा समावेश या अनुभवांमध्ये येतो. आता देखील अशाच एका अभिनेत्रीच्या अनुभवाबद्दलची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे ती अभिनेत्री चक्क रोहित शेट्टीची कथित गर्लफ्रेंड होती. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीची कथित गर्लफ्रेंडचं नाव देखील या यादीत समाविष्ट आहे.
ही अभिनेत्री म्हणजे प्राची देसाई, जिने 2008 मध्ये ‘रॉक ऑन’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अभिनेत्रीने एकदा तिच्यासोबत घडलेल्या कास्टिंग काउच घटनेबद्दल सांगितलं होतं. त्यावेळी प्राचीने तो चित्रपट नाकारला होता असं म्हटलं जातं.
दिग्दर्शकाने चित्रपटाच्या बदल्यात एक वाईट मागणी केली होती.
बॉलिवूड बबलला दिलेल्या एका मुलाखतीत प्राची देसाईने सांगितले होते की, एका मोठ्या चित्रपटासाठी तिला तडजोड करण्यास सांगण्यात आले होते. प्राचीने हा अनुभव सांगताना म्हटलं की, “मला एका खास चित्रपटात, मोठ्या चित्रपटात काम करण्यासाठी थेट ऑफर देण्यात आल्या होत्या. पण मी स्पष्टपणे नकार दिला. मी नकार दिल्यानंतरही त्या दिग्दर्शकाने मला फोन केला, तेव्हा मी स्पष्टपणे त्याला नकार दिला आणि मी सांगितलं की मला तुमच्या चित्रपटात रस नाही.”
रोहितचे अभिनेत्रीसोबतचे हे नाते फार कमी जणांना माहित
पण हे फार कमी जणांना माहित असेल की, प्राची देसाईचे नाव एकेकाळी तिच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा असलेला दिग्दर्शक रोहित शेट्टीशी जोडले गेले होते. ‘बोल बच्चन’च्या शूटिंगदरम्यान ते जवळ आले असा दावा अनेक अहवालांमध्ये करण्यात आला होता. दोघेही एकत्र राहत असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. या विवाहबाह्य संबंधामुळे रोहित त्याची पत्नी माया शेट्टीला सोडून जात असल्याचा दावाही करण्यात आला. नंतर त्याने त्याच्या पत्नीशी बोलून हा वाद संपवला. त्यानंतर रोहितचे प्राचीशी असलेले नाते संपुष्टात आले. तथापि, दोघांनीही या अफवांवर कधीही प्रतिक्रिया दिली नाही.
प्राची देसाईची अभिनय कारकीर्द
प्राची देसाईच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, तिने रॉक ऑन नंतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ती ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, ‘बोल बच्चन’, ‘आय, मी और करण’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. त्यानंतर ती चित्रपटांपासून दूरच आहे.