Drugs Case | रकुल प्रीतला हायकोर्टाचा दिलासा, वृत्तवाहिन्यांना माफी मागावी लागणार

| Updated on: Dec 11, 2020 | 8:14 AM

ज्यांनी ड्रग्ज प्रकरणाच रकुल प्रीतला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्या सर्व न्यूज चॅनेलला न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टॅण्डर्ड अथॉरिटीने (NBSA) खडसावलं आहे

Drugs Case | रकुल प्रीतला हायकोर्टाचा दिलासा, वृत्तवाहिन्यांना माफी मागावी लागणार
Follow us on

मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात एनसीबीने अभिनेत्री रकुल प्रीत सिंगला चौकशीसाठी बोलावलं होतं (Media Channel To Apologize To Rakulpreet Singh). यादरम्यान, अनेक बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये चालवण्यात आल्या. याविरोधात रकुल प्रीत सिंगने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी रकुल प्रीतला न्याय देत चुकीची बातमी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे (Media Channel To Apologize To Rakulpreet Singh).

ज्यांनी ड्रग्ज प्रकरणाच रकुल प्रीतला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्या सर्व न्यूज चॅनेलला न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टॅण्डर्ड अथॉरिटीने (NBSA) खडसावलं आहे. त्याशिवाय, एका बड्या चॅनलला माफी मागण्यासही सांगण्यात आलं आहे. तसेच, ज्या व्हिडीओमध्ये रकुल प्रीतला चुकीचं दाखवण्यात आलं आहे, त्या सर्व व्हिडीओंना परत घेण्याची ताकीद दिली आहे.

रकुल प्रीतने त्यांच्याविरोधात दाखवण्यात आलेल्या बातम्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान, रकुलच्या वकिलांनी तिचा पक्ष मांडताना सांगितलं, “रकुलविरोधात कुठलाही गुन्हा दाखल नाही, कुठलंही प्रकरण नाही, मात्र प्रसारमाध्यमांनी सतत त्यांच्याविरोधात चुकीच्या बातम्या चालवल्या.”

“ज्या प्रसारमाध्यमांनी फेक न्यूज चालवली आहे, ते नॅशनल ब्रॉडकास्ट असोसिएशनचे सदस्या आहेत. ते कुठलं A B C D चॅनल नाही. त्यांनी जबाबदारीने वागायला हवं. या चॅनलमुळे रकुल प्रीतची इमेज खराब होत आहे. त्यामुळे आता न्यायालयालाच या प्रकरणी काहीतरी निर्णय घ्यायला हवा”, असं रकुल प्रीतच्या वकिलांनी म्हटलं (Media Channel To Apologize To Rakulpreet Singh).

रकुल प्रीतने काही माध्यमांवर तिची बातमी दाखवण्यावर आपत्ती व्यक्त केली. मीडिया ट्रायलमुळे त्यांच्या सोशल इमेजला नुकसान होत आहे, सोबतच कुटुंब आणि मित्रांवरही वोईट परिणाम होत आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये रकुलची कुठलीही बातमी दाखवण्यावर बंदी आणावी अशी मागणी तिच्या वकिलांनी केली आहे.

“प्रसारमाध्यमांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या गोष्टींचा सुशांत सिंग राजपूत प्रकरणी होणाऱ्या ट्रायलवरही वाईट परिणाम होईल, असंही तिच्या वकिलांनी सांगितलं. एनसीबीने रकुलला उपस्थित होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ती चौकशीसाठी हजर होती. पण यापूर्वीच मीडियाने त्यांच्या घराला घारव घातला”, असंही रकुलचे वकील म्हणाले.

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरण सुशांत सिंग राजपूकृतच्या मृत्यूनंतर समोर आलं. या प्रकरणी एनसीबीने रकुल प्रीतसोबतच दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि क्षद्धा कपूरलाही चौकशीसाठी बोलवलं होतं.

Media Channel To Apologize To Rakulpreet Singh

संबंधित बातम्या :

ड्रग्ज कनेक्शनमध्ये रियाकडून बॉलिवूड अभिनेत्रींची नावे, सारा अली खान आणि रकुल प्रीत NCB च्या रडारवर

ड्रग्ज कनेक्शन : दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यांना NCB चे समन्स!

Rakul Preet | समन्स स्वीकारण्यास रकुल प्रीतची टाळाटाळ, एनसीबीचा दावा