ड्रग्ज कनेक्शन : दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा, रकुल यांना NCB चे समन्स!

दीपिकाला शुक्रवार 25 सप्टेंबर, तर श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांना शनिवार 26 सप्टेंबरला हजर राहण्याचे एनसीबीचे आदेश आहेत.

ड्रग्ज कनेक्शन : दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा, रकुल यांना NCB चे समन्स!
Follow us
| Updated on: Sep 23, 2020 | 6:33 PM

मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी एनसीबीने बड्या बॉलिवूड अभिनेत्रींना बोलावणे धाडले आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंगला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने समन्स बजावले आहे. पुढील तीन दिवसात चौघींची चौकशी होणार आहे. (Deepika Padukone Shraddha Kapoor Sara Ali Khan summoned by NCB)

श्रुती मोदी, रकुल प्रीत सिंग आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांना उद्या (24 सप्टेंबर) चौकशीसाठी बोलावले आहे. दीपिकाला शुक्रवार 25 सप्टेंबर, तर श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांना शनिवार 26 सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश आहेत. दीपिका सध्या गोव्यात चित्रीकरण करत असून, साराही आपल्या आई समवेत गोव्यातील घरी राहत आहे.

या आधीही अनेक वेळा श्रुती मोदीची चौकशी केली गेली आहे. श्रुती मोदी ही रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर होती. श्रुती मोदीच्या या आधीच्या चौकशीच्या आधारावर अभिनेत्रींना प्रश्न उत्तरे केली जाणार आहेत.

एनसीबीच्या हाती पुरावे लागल्याने या अभिनेत्रींना समन्स बजावण्यात आले आहेत. तत्पूर्वी, एनसीबीने मंगळवारी क्वान या टॅलेंट कंपनीचे सीईओ ध्रुव चितगोपेकर, टॅलेंट मॅनेजर जया साहा आणि सुशांतची मॅनेजर राहिलेल्या श्रुती मोदीची सुमारे सहा तास चौकशी केली. यावेळी 15 बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. (Deepika Padukone Shraddha Kapoor Sara Ali Khan summoned by NCB)

दरम्यान, ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या रिया चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडी मंगळवारी (22 सप्टेंबर) संपणार होती. 8 सप्टेंबर रोजी रियाला अटक करून तिची रवानगी भायखळा तुरुंगात करण्यात आली होती. पोलीस कोठडीऐवजी रियाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली होती. रियाने ड्रग्ज देवाण-घेवाणीत आपला सहभाग असल्याचे मान्य केल्यावर एनसीबीकडून तिला अटक करण्यात आली होती. रिया चक्रवर्ती या प्रकरणात दोषी आढळल्यास तिला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर एनसीबीने तपास करण्यास सुरुवात केली होती. एनसीबी जसजशी खोलवर तपास करतेय, तसतसे बडे मासे हाती लागताना दिसत आहेत. क्वीनचा निर्माता मधु मांटनेलाही एनसीबीने चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. सुशांत सिंहची टॅलेंट मॅनेजर जया साहाने एनसीबीच्या चौकशीत मधु मांटेनाचे नाव घेतले होते. एनसीबीकडून जया साहा, दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश, क्वॉन कंपनीचा CEO ध्रुव चितगोपेकर, श्रुती मोदी यांची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली आहे. जया साहाची सोमवारीही 5 तास कसून चौकशी झाली आहे.

संबंधित बातम्या 

ड्रग्ज कनेक्शनमध्ये रियाकडून बॉलिवूड अभिनेत्रींची नावे, सारा अली खान आणि रकुल प्रीत NCB च्या रडारवर?

श्रद्धा कपूर आणि सुशांतसाठी ‘सीबीडी ऑईल’ मागवायचे; जया साहाची NCB कडे कबुली

रियामागची शुक्लकाष्ट संपेना, पावसामुळे जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर

ड्रग्ज कनेक्शनमध्ये बॉलिवूडच्या आणखी दोन अभिनेत्रींची नावं समोर, NCB कडून दीपिका आणि दियाला समन्स

(Deepika Padukone Shraddha Kapoor Sara Ali Khan summoned by NCB)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.